सयुक्त राष्ट्र : कोरोना संसर्गादरम्यान लहान मुलांच्या लसीकरणावरही वाईट परिणाम झाला आहे. संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केली आहे की, जागतिक पातळीवर २३ मिलियन (२.३ कोटी) मुलांना गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे आलेल्या व्यत्ययांमुळे डिप्थीरिया-टेटनस-पर्टुसिस (DTP-1) संयुक्त लसीचा पहिला डोस मिळू शकलेले नाही. डीपीटी लस मुलांचे डिप्थीरिया, पर्टुसिस आणि टेटनसपासून संरक्षण करण्यास मदत करते. याबाबतीत भारत सर्वात पुढे आहे, जेथे सन २०२० मध्ये डीटीपी-१ लसीचा पहिला डोस न मिळालेल्या मुलांची संख्या जगभरामध्ये सर्वाधिक आहे.
कोरोना विषाणूमुळे जागतिक सेवेतील अडथळे दर्शविणारी ही पहिली अधिकृत आकडेवारी आहे त्यामध्ये बहुतांश देशांनी मान्य केले आहे की गेल्या वर्षी कोरोनामुळे मुलांच्या लसीकरणाच्या दरात घट झाली आहे. जागतिक आरोग्य संस्था आणि संयुक्त राष्ट्राची संस्था यूनिसेफच्या आकडेवारीनुसार असे दिसून आले आहे की, सन २००९ नंतर ही सर्वाधिक संख्या आहे आणि २०१९च्या तुलनेत ३० लाखाहून अधिक आहे.
डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रॉस एडनॉम घेब्रेयसस यांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसच्या लसींसाठी संघर्ष करणार्या देशांमध्ये मुलांच्या लसीकरण मोहिम कमकुवत झाल्या आहेत, आणि त्यामुळे मुलांमध्ये गोवर, पोलिओ किंवा मेनिन्जाइटिस यासारख्या धोकादायक परंतु प्रतिबंधात्मक रोगांचा धोका वाढला आहे.
कोरोनाचा मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास –
संयुक्त राष्ट्राने सांगितले की, भारताने मोठ्या संख्येने मुलांना डिप्थीरिया-टेटनस-पर्टुसिस (डीटीपी-१) चा पहिला डोस दिलेला नाही. यूनिसेफच्या हेनरीटा फोर यांनी सांगितले की, कोरोना संसर्गापूर्वी देखील परिस्थिती चिंताजनक होती. आम्ही दोन वर्षांपूर्वी, मोठ्या प्रमाणात गोवरच्या प्रादुर्भावाविरूद्ध मुलांच्या लसीकरण लढाईत पराभूत होऊ लागलो होतो. परंतु संसर्गामुळे परिस्थिती आणखी खराब झाली. आता प्रत्येकाच्या दृष्टीने सर्वात आधी कोरोना लस महत्वाची आहे.
फायझर आणि मॉडर्नाच्या वॅक्सीनमुळे हृदयाला सूज –
There was a bad effect on the vaccination of children during the Corona period, in 2020 2.6 crores did not get the first dose of DTP. Globally, 23 million (2.3 crore) children have not been able to get the first dose of diphtheria-tetanus-pertussis (DTP-1) joint vaccine due to disruptions caused by corona infection last year. The DPT vaccine helps protect children from diphtheria, pertussis, and tetanus. India is at the forefront of this, where the number of children who did not get the first dose of the DTP-1 vaccine in 2020 is the highest in the world.
झायडस कॅडिलाने १२-१८ वर्षे वयोगटातील मुलांवर केले लसीचे परिक्षण… –
झायडस कॅडिलाने १२-१८ वर्षे वयोगटातील मुलांवर केले लसीचे परिक्षण…
कोव्हिड संसर्गामुळे जगभरातील २ कोटी ३० लाख मुले विविध लसींपासून वंचित! –
कोव्हिड संसर्गामुळे जगभरातील २ कोटी ३० लाख मुले विविध लसींपासून वंचित!