काम नसल्याने कर भरण्यास विलंब झाला : कंगना रणावत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत तिच्या बिनधास्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. कंगनाने दावा केला आहे की, ती देशातील सर्वाधिक कर (टॅक्स) भरणारी अभिनेत्री आहे. परंतु मागील वर्षी ती तिचा निम्मा कर भरू शकली नाही कारण तिच्याकडे काहीच काम नव्हते त्यामुळे निम्मा कर भरता आला नाही.

कंगनाचे असेही म्हणणे आहे की, सरकारने थकित रकमेवर व्याज आकारले तरी देखील तिला यामुळे काहीच अडचण नाही. कंगनाने इंस्टा स्टोरीवर याबाबत माहिती देताना लिहिले आहे की, ‘मी सर्वात जास्त कर भरणाऱ्यांमध्ये येते. मी माझ्या उत्पन्नावर ४५ टक्के कर भरते. जरी मी सर्वाधिक कर देणारी अभिनेत्री असले तरी काम नसल्यामुळे गेल्या वर्षी निम्मा कर भरू शकले नाही.’

तिने सांगितले की, ‘मी आयुष्यात प्रथमच कर भरण्यास उशीर केला आहे, परंतु सरकारने माझ्या थकित रकमेवर व्याज आकारला तरी मला काहीच अडचण नाही. आपल्यासाठी काळ कठीण असू शकतो परंतु आपण सर्व मिळून काळाबरोबर आणखी मजबूत होऊ शकतो.’

कंगनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट थलाइवी प्रदर्शित होणार आहे, परंतु कोरोनाच्या प्रकरणांत वाढ झाल्याने कंगनाचा हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. थलाइवी चित्रपट सिनेमाघरांत २३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. याशिवाय कंगना तेजस, धाकड पाईपलाईन मध्ये आहे.
Kangana has claimed that she is the highest tax paying actress in the country. But last year she could not pay half her tax.


रिया चक्रवर्ती मोस्ट डिझायरेबल वुमनच्या यादीत अव्वल स्थानी! –

दिपिका-दिशाला मागे सोडून रिया चक्रवर्ती मोस्ट डिझायरेबल वुमनच्या यादीत अव्वल स्थानी!

Social Media