हे संकट मोठे आहे, आभाळच फाटले आहे : आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई  : राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar ) यांनी  राज्यातील पूरस्थिती अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयात आपतकालीन विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यासमवेत आढावा बैठक झाल्यानंतर वडेट्टीवार यानी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, हे संकट मोठे आहे, आभाळच फाटले आहे. ज्या भागात सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग (corona infection)आहे त्याच भागात हे संकट देखीलओढवले आहे त्यामुळे केवळ पूरग्रस्तांचा(flood situation) बचावच नाही तर कोरोना आणि पूर ओसरल्यानंतर साथरोगांचे थैमान होवू नये म्हणून देखील काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी सर्वाच्या मदतीची गरज आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही असेही ते म्हणाले.

रेड अलर्टच्या मर्यादेच्या दुपटीने पाऊस

Rain double the red alert limit

वडेट्टीवार म्हणाले की, काल सायंकाळ नंतरच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या संकटात जनतेला मदतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टमध्ये अपेक्षीत मर्यादेच्या दुपटीने पावसाचे थैमान सुरू होते, त्यामुळे हे अभूतपूर्व संकट आहे. त्यात पावसाचे सारे अंदाज खोटे ठरवत पाऊस सुरूच आहे. राज्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात मदत करण्याचे सारे प्रयत्न सुरू असल्याचे त्यानी सांगितले. त्याकरीता केंद्र सरकारच्या नौदल आर्मी आणि तटरक्षक तसेच हवाईदलाचे सहकार्य मिळत असून आता पर्यंत रत्नागिरीत दोन हजार तर रायगड मध्ये सहाशे जणांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे.

प्रशासनला न जुमानता लोक गावात गेले

People went to the village despite the administration

ते म्हणाले की, ज्या तळई गावात दुर्घटना घडली आहे तेथे दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने लोकांना सुरक्षीत जागी हलविले होते. मात्र नंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने लोक प्रशासनला न जुमानता पुन्हा गावात गेले होते त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला आणि संपर्काचे साधन नसल्याने तेथे मदत पोहोचण्यापूर्वी दुर्घटना झाली आहे. दरवर्षी याभागातील धोकादायक ठिकाणी प्रशासनाकडून नागरीकांना धोक्याचा इशारा देत स्थलांतर केले जाते मात्र त्यानंतरही काही घटना घडल्य आहेत असे ते म्हणाले. ते म्हणाले की की सध्या सैन्यदलाच्या १४ तुकड्या मदत कार्यात सहभागी झाल्या असून राज्य आणि केंद्र आपत्ती व्यवस्थापन दलांसोबत त्या देखील मदत कार्याला लागल्या आहेत. मात्र पावसांचा जोर कायम असून पाण्याचा प्रवाह कमी झाल्याशिवाय मदतीला वेग येण्यात अडचणी येत आहेत. असे ते म्हणाले.

State disaster management minister Vijay Wadettiwar termed the flood situation in the state as unprecedented. Wadettiwar interacted with the media after a review meeting with the Chief Minister at an emergency department meeting in the ministry. Speaking at the time, he said that the crisis is big, the sky is torn apart. The crisis has also occurred in the areas where the highest corona infection is located, so care has to be taken not only to protect the flood victims but also to prevent epidemics after the corona and floods recede.


पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्यास १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे शिफारस करावी : बाळ माने –

पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्यास १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे शिफारस करावी : बाळ माने

Social Media