महाभ्रष्ट भाजपा सरकार विरोधात काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन.

मुंबई : राज्यातील असंवैधानिक सरकार हे शेतकरी, कामगार, तरुण, महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक विरोधी आहे. या सरकारच्या जनविरोधी नितीविरोधात काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारून राज्यभर चिखल फेको आंदोलन केले. वाढती महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते, बियाणांचा काळा बाजार, वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा सुळसुळाट, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नी हे आंदोलन करून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.

मुंबईत काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप, चरणसिंह सप्रा, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार डॉ. अमरजितसिंह मनहास यांनी चिखल फेको आंदोलनात सहभाग घेतला.

नागपूरमध्ये(Nagpur) शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले, यावेळी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, आमदार रविंद्र धंगेकर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, प्रदेश उपाध्यक्ष आबा बागुल, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, संजय बालगुडे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदेडमध्ये खासदार वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, हनुमंत पाटील बेटमोगरेकर, बी. आर. कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

नाशिक(Nashik) शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने शहर काँग्रेस अध्यक्ष अँड आकाश छाजेड व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूरमध्ये शहराध्यक्ष सचिन प्रल्हाद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. गोंदियामध्ये जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. याशिवाय सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, धुळे, वाशीम, जालना, अमरावती, अकोला, श्रीरामपूर, बुलढाणा जिल्ह्यातही चिखल फेको आंदोलन करून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.

Social Media