आजकाल वजन वाढायला लागले की, डाॅक्टर थायरॉईडची(Thyroid) तपासणी करण्याचा सल्ला देतात. हो. कारण अचानक वाढणाऱ्या वजनाच्या मुळाशी थायरॉईड(Thyroid) असू शकते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. पण घाबरु नका योग्य आहार तुमचे या आजारापासून रक्षण करु शकतो.
बरं हे थायरॉईड(Thyroid)प्रकरण नेमकं काय आहे. थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती गळ्याच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे असते.
थायरॉईड आहे हे कसे ओळखावे. साधारणपणे थायरॉईडची लक्षणे पुढीलप्रमाणे दिसतात.
बद्धकोष्ठता (Constipation)(संडासला साफ होत नाही.), शरीराचं वजन अचानक कमी जास्त होत राहते, हात पाय थंड पडतात, त्वचा कोरडी (Dry skin)पांढरी पडते, ताण तणाव वाटतो, आळशीपणा येतो, शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळे, केस गळणे. थायरॉइडचे विकार होण्याची कारणे गुंतागुंतीची असू शकतात. परंतु, काही पथ्य पाळल्यास होऊ घातलेले थायरॉइड विकार टाळता येतात. त्यासाठी आहार(diet), व्यायाम(Work out) आणि वैद्यकीय सल्ला(Medical advice) महत्त्वाचा आहे.
चौरस आहार हा थायरॉईडला(Thyroid) दूर ठेवण्यास महत्त्वाचा ठरतो. आयोडिन, लोह, अ जीवनसत्त्व (Vitamin A)यांचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन हॉर्मोन्सच्या उत्पादनाला चालना देते.
साखर (sugar)आणि पिष्टमय पदार्थांचे(Gallstones) मर्यादित सेवन करावे. या दोन्ही पदार्थांमुळे वजन वाढते. ज्यामुळे थायरॉइडच्या उत्पादनावर आणि अभिसरणावर परिणाम होतो.
तेल-तूप-चरबी(Oil-ghee-fat) वाढविणाऱ्या पदार्थांपासून दूर राहिल्याने हृदयविकार(Heart disease), डायबेटिससह(Diabetes) हॉर्मोन्सच्या विकारांवर नियंत्रण मिळवता येतो.
दररोज ३० मिनिटे व्यायाम केल्याने रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे रक्तातील थायरॉइड शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते.
हा आजार टाळण्यासाठी काय खावे.
◼️सफरचंद खाणं हायपोथायराॅयडिज्म(Hypothyroidism) समस्येत फायदेशीर मानलं जातं. कारण सफरचंदात फायबर आणि क जीवनसत्वाचं (Vitamin C)प्रमाण जास्त असतं.
◼️ बेरी गटातील फळं खावीत. स्ट्राॅबेरी(Strawberries) खाण्याचा सल्ला दिला जातो. बेरी आणि स्ट्राॅबेरी (Berries and strawberries)फळांमध्ये ॲण्टिऑक्सिड्ण्टसचं (Antioxidants)प्रमाण भरपूर असतं त्याचा फायदा थायराॅइड (Thyroid)ग्रंथीला होतो.
◼️संत्री(Oranges) खाव्यात. संत्र्यामध्ये क जीवनसत्व (Vitamin C)असतं. हायपोथायराॅयडिज्म समस्येत वजन कमी करण्यासाठी संत्री उपयुक्त ठरतात.
◼️अननसात क जीवनसत्व असते. त्यामुळे अननस अवश्य खा.
आहाराची पथ्यं पाळल्यास थायरॉईड मध्ये वजन नियंत्रित ठेवणे शक्य होते.
थायरॉईड(Thyroid) ची समस्या असेल तर सोयाबीन, कोबी, ब्रोकोली(Broccoli), पनीर, बटर, जंक फूड, काॅफी यांचे आहारातील प्रमाण कमी करा. नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, औषधे घ्यावीत.
एक नक्की जर आहार व्यवस्थित केला तर थायरॉईडपासून नक्की सुटका होऊ शकते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)