RRR: चित्रपटगृहांमध्ये ‘RRR’ रिलीज झाल्यानंतर 10 दिवस तिकिटे महागतील

मुंबई : बहुचर्चित ‘RRR’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘आरआरआर’ हा चित्रपट २५ मार्चला प्रदर्शित होणार आहे. हा बिग बजेट चित्रपट असल्याने निर्मात्यांनी सरकारला तिकीट दरात वाढ करण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘आरआरआर’ (RRR)चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटाचे बजेट 400 कोटी रुपये आहे. त्यामुळे या चित्रपटाची तिकिटे महागणार आहेत. आरआरआरमध्ये अजय देवगण(Ajay Devgn), आलिया भट्ट(Alia Bhatt), ज्युनियर एनटीआर (Jr NTR )आणि राम चरण (Ram Charan)मुख्य भूमिकेत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

‘RRR’ चित्रपटातील ‘शोले’ या गाण्यात भारतातील महापुरुषांची झलक आहे. या चित्रपटात रामचरणने स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांची भूमिका साकारली आहे. ज्युनियर एनटीआर ‘कोमाराम भीम’च्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे.


डीप नेकलाइन ड्रेसमध्ये दिसला जान्हवीचा ग्लॅमरस अंदाज

Holi 2022 चे सर्वात हिट गाणे,  ‘फलाना बो फरार भैल’ पहिल्या क्रमांकावर  करत आहे ट्रेंड

Social Media