Beauty Tips : पांढर्‍या केसांची समस्या दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश!

नवी दिल्ली : वाढत्या वयात केसगळतीची आणि पांढऱ्या केसांची समस्या (White hair problem)सामान्य आहे, परंतु कमी वयात केस पांढरे होणे हा एक चिंतेचा विषय आहे. याची अनेक कारणे असू शकतात, जसे की प्रदूषण(pollution), चुकीचा आहार आणि शरीरात खनिज तत्वांची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत. याशिवाय अनुवांशिक आजार (genetic disease)हा देखील एक मुख्य कारण आहे. पांढऱ्या केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी लोक केसांसाठी रंगाचा वापर करतात. तथापि, बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर डायमध्ये केमिकल्स (रसायने)आढळतात, जे केसांना हानी पोहोचवतात.

beauty-tips : त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे – 

तज्ञांच्या मते, शरीरातील व्हिटॅमिन-सी च्या अभावामुळे केस गळतीची किंवा पांढरे होण्याची समस्या उद्भवते. यासाठी पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी असेलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. याशिवाय योग्य दिनचर्येचे पालन, योग्य आहार आणि तणावापासून अंतर आवश्यक आहे. जर तुम्ही अकाली पांढऱ्या केसांमुळे आणि गळतीमुळे त्रस्त असाल तर, आहारात या गोष्टींचा समावेश नक्की करा. चला तर मग जाणून घेऊयात….

 व्हिटॅमिन सी (vitamin C)-

तज्ञांच्या मते, व्हिटॅमिन-सी च्या कमतरतेमुळे केस अकाली पांढरे होण्यासह गळून पडण्यास सुरुवात होते. यासाठी आहारात लिंबू, संत्री, द्राक्षे इत्यादी व्हिटॅमिन ‘सी’युक्त फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

 प्रोटीन (protein)-

तुम्ही आहारात प्रथिनेयुक्त आहाराचा समावेश करा. प्रथिने संपूर्ण शरीराच्या विकासास मदत करते. विशेषत: केसांची वाढ होण्यासाठी आणि पांढर्‍या केसांपासून मुक्ति मिळण्यासाठी अंडी, दूध, चिकन आणि मासे यांचा आहारात समावेश करा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.

 झिंक आणि सेलेनियम (Zinc and Selenium)-

तज्ञांच्या मते, झिंक (जस्त) आणि सेलेनियम केसांच्या वाढीस आणि गडद होण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यासाठी, आहारात जस्त आणि सेलेनियम असलेल्या गोष्टींचा निश्चितपणे समावेश करा. याव्यतिरिक्त संतुलित आहार आणि पुरेशी झोप घ्या तसेच जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे पांढर्‍या केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळेल.

To remove the problem of white hair, include these things in the diet.


Beauty Tips : मृतत्वचेसह वाढत्या वयाचा परिणाम कमी करण्यासाठी कॉफीचा फेसपॅक फायदेशीर… –

Beauty Tips : चेहऱ्याला तरूण आणि सुंदर बनविण्यासाठी असा करा कॉफीच्या फेसपॅकचा वापर….

Beauty Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपचार करेल अंड्याचा मास्क –

Beauty Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपचार करेल अंड्याचा मास्क; जाणून घ्या याची प्रक्रिया….

Social Media