जागतिक छाया चित्र दिना निमित्त थोडेसे……!

आज जागतिक छायाचित्रण दिन…!

दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे !

काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल… टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले. तथापि, या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची एक्साइटमेंट आजही तशीच आहे. १९ ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. कारण, या दिवशी सन १८३९ साली फ्रेंच सरकारने फोटोग्राफीचे पेटेंट विकत घेऊन जगाला मुक्त केले. काही वस्तू प्रकाश आणि अंधाराचा खेळ यामुळे बदलतात. या साध्या तत्त्वातून साधारण सन १८०० मध्ये कॅमेरा ही कल्पना विचारात आली. १८३९ च्या दरम्यान व्यावसायिक छायाचित्रकलेचा जन्म झाला.Today is World Photography Day!

जोसेफ निकफेर निएपेस यांनी सर्वात पहिला फोटो काढल्याचे सांगितले जात आहे. जोसेफ यांनी १९२६ ते १९२७ दरम्यान फ्रान्सच्या बरगंडी प्रदेशातील ‘द ग्रास’ येथील एका खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याचे पहिले छायाचित्र टिपले होते .

जगभरातल्या छायाचित्रकारांनी १९ ऑगस्ट २०१० साली पहिल्या जागतिक दिनाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात जगभरातून अनेक छायाचित्रकारांनी भाग घेतला होता. याच चित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांना १०० हून अधिक देशांनी पहिले. त्यामुळे १९ ऑगस्ट हा दिन जागतिक छायाचित्र दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.

इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॅमेरा १९९० मध्ये जन्माला आला. त्यानंतर सातत्याने डिजिटल कॅमेऱ्यामध्ये बदल होत गेले, उत्क्रांती होत गेली. सध्या छायाचित्रण व्यवसाय नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यानिमित्ताने अनेक हौशी फोटोग्राफर आपल्याला पाहायला मिळतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले .

प्रकृतीने प्रत्येक प्राणीमात्राला जन्मत: एक कॅमेरा दिला आहे, ज्यामुळे ते प्रत्येक वस्तूच्या छबीला आपल्या डोक्यात अंकित करू शकते आणि तो कॅमेरा म्हणजे आपले डोळे !

तसं पाहिलं तर प्रत्येक प्राणी एक फोटोग्राफर आहे. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरुवात केली आणि अनेक आविष्कारांसोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला. वेळे सोबत समोर चालतांना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थाई रुपात समोर आणले. याच प्रवासाच्या यशाला आपण फोटोग्राफी डेच्या रुपात साजरा करतो. हजार शब्दांत जे सांगता येत नाही, त्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगू शकते, असे आपल्या काही वेळेस निदर्शनास आले असेल. गणेशोत्सव अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला असून त्यातच सततच्या पावसामुळे निसर्ग सौंदर्यालाही बहर आला आहे. मात्र, हे सगळं चित्र कॅमे-यात टिपण्यासाठी कोरोनामुळे घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे. या महामारीमुळे गणेशोत्सव, दसरा, दिवाळी सणांवरही मोठे संकट ओढावल्याने फोटोग्राफी व्यवसायालाही याचा फटकाच बसणार आहे. सध्या प्रत्येकाकडे मोबाइल फोन आल्याने फोटोग्राफी व्यवसायाला उतरती कळा आली आहे. महागड्या मोबाइलमध्ये कॅमे-याच्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने फोटोग्राफी व्यवसायाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सध्याच्या फोरजी जमान्यात जुन्या कॅमेरा फोटोग्राफीला अल्पच प्रतिसाद मिळत आहे.

आज कॅमेरा खरेदी करतानाही अनेक हौशी कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे, त्याचा मेगाफिक्सल किती सिमॉस किंवा सीसीडी (कॅमेराचा सेंसर) त्याचा साईज किती आहे. बॅटरी कोणत्या प्रकारची व किती कपॅसिटी आहे, त्याची आवर्जुन चौकशी करतात, ते योग्यही आहे. सध्या फोटोग्राफी व्यवसायामध्ये फोटोग्राफरना कॅमेरा घेताना फार दक्षता घेतली पाहिजे. कारण आपण कोणत्या प्रकारचे काम करतो, आपल्याला फोटो सर्वात मोठा किती साईजमध्ये करावयाला लागतो, आपण कोणत्या ठिकाणी काम करतो त्याचबरोबर आपल्याला अंदाजे झूम किंवा वाईड लेन्सची गरज किती आहे, हे पाहणे गरजेचे आहे. शिवाय कॅमेरामध्ये ऑडीओ, व्हिडीओची सोय आहे काय, फोकसिंग पॉईंट किती आहे व त्यामध्ये कशा स्वरुपात आपण बदल करू शकतो, याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे.
कॅमेरा घेतल्यानंतर त्या कॅमेऱ्याबरोबर आलेले कॅटलॉग महत्त्वपूर्ण ठरतात. फोटोग्राफीची भाषा. उदा. अॅपारचर, शटरस्पिड, खडज, व्हाईट बॅलन्स, लार्ज, मेडियम, स्मॉल, फाईन, मेडीयम, बेसिक अशा पद्धतीने चित्रमय माहिती असते.

टिप : या माहिती सोबत असलेला फोटो हा १९ ऑगष्ट २०१५ चा आहे,
यात निसर्गाच्या उदभूत जिद्दीचे दर्शन दिसत असल्याने त्या वेळी सहजच मोबाईल कॅमेर्‍यातून हा देखावा कैद केला होता !

आकाशातून जमिनीकडे झेपावणाऱ्या पारंब्या तर जमिनी कडून आकाशाला गवसणी घालण्यासाठी जमिनी कडून आकाशाकडे जाऊ पाहणाऱ्या रान वेली !

असे हे विरोधाभासी दृष्य निसर्गाचा सुंदर कलेचा हा एक नमुना आहे !
हे ठिकाण तिसगांव नाक्या पासुन काही अंतरावरच आहे परंतु सद्या या ठिकाणी डेव्हलपमेंटचा काम चालु असल्याने हा संपूर्ण परिसर भकास झाला आहे .

 

संकलन – आनंद गायकवाड

Social Media