नवी दिल्ली : आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति किलो 3,000 रुपयांनी घसरला आहे. रशिया-युक्रेन संघर्षावरून तणावामुळे सोन्याच्या किमती अस्थिर झाल्या आहेत. भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,950 रुपये आहे. गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम
आता रशिया-युक्रेन युद्धाचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. मुंबईत आज सोन्याचा दर 46,700 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये तो 47,880 रुपये आहे. केरळमध्ये आज सोन्याचा भाव 46,700 रुपये आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,700 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर चेन्नईमध्ये 47,880 रुपये होता. केरळमध्ये सोन्याचा भाव 46,700 रुपये आहे
रशियावरील निर्बंधांचा जागतिक बाजारपेठांवरही परिणाम
युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अमेरिका आणि युरोपीय देश रशियावर नवीन निर्बंध लादण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे. रशिया-युक्रेन संकटाशी संबंधित नवीन घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात तेजी आहे.मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 1.5 टक्क्यांनी वाढून 50,990 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोन्याचे भाव झपाट्याने वाढत होते.
22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 46,700 50,950
पुणे 46,820 51,130
नागपूर 46,820 51,000
नाशिक 46,820 51,130
दिल्ली 46,700 50,950
कोलकाता 46,700 50,950
बंगलोर 46,700 50,950
चेन्नई 47,880 52,230