शिमल्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी हॉटेलांमधील व्यवसायात लक्षणीय वाढ…

शिमला : हिमाचल प्रदेशात, कोरोना कर्फ्यू दरम्यान नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर पर्यटकांची गर्दी खूप वाढली आहे. मैदानी भागातील गरमीपासून आराम मिळविण्यासाठी राजधानी शिमल्यात पर्यटकांची शनिवारी आणि रविवारी रहदारी दुपटीने वाढली होती. शिमल्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी हॉटेलांमधील व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ६० ते ७० टक्के पर्यटक आले होते तर, यावेळेस १०० टक्क्यापर्यंत पर्यटकांची उपस्थिती होती.

आनंददायी हवामानाची मजा घेण्यासाठी शिमल्यात पर्यटकांची गर्दी….

A crowd of tourists in Shimala to enjoy the pleasant weather.

हॉटेल असोसिएशन शिमलाचे सल्लागार हरनाम कुकरेजा यांचे म्हणणे आहे की, शनिवार, रविवारी बाजार उघडल्यानंतर व्यवसाय वाढला आहे. तर, संसर्गाचा धोका कमी झाल्याने पर्यटक कुटुंब आणि मित्रांसह शिमल्याला भेट देत आहेत. पर्यटकांच्या वाढत्या रहदारीमुळे पर्यटन व्यवसायिक यापूर्वी झालेल्या तोट्यातून सावरताना दिसून येत आहेत.

पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ‘फागू’ हे ठिकाण सर्वोत्तम! – 

शहरातील रिज मैदानावर आनंददायी हवामानाची मजा घेण्यासाठी पर्यटक येत आहेत. तसेच ठिकठिकाणी फोटो काढताना पर्यटकांची गर्दी दिसत आहे. तथापि येथे शारीरिक अंतराचा नियम पाळला जात नव्हता. काहीजण मास्क काढून सेल्फी घेत होते तर, काहीजण व्हिडीओ कॉलद्वारे आपल्या नातेवाईकांना शिमल्याचे हवामान दाखवत होते. रिज मैदानाव्यतिरिक्त मालरोडवर देखील अनेक पर्यटक बिना मास्कचे फिरताना दिसून आले.

नैनीतालमध्ये दीड महिन्यानंतर पुन्हा रज्जूमार्ग सुरू….. –

शिमल्यामध्ये एक महिन्याच्या कोरोना कर्फ्यूमुळे संसर्गाचा दर कमी होत आहे, परंतु कोरोना चाचणी अहवालाशिवाय राज्याच्या सीमा उघडल्यानंतर संसर्गाचा धोका आणखी वाढला आहे. पर्यटकांच्या दुर्लक्षामुळे स्थानिक लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्य विभागाने लोकांना कोरोनाविरूद्ध अधिक खबरदारी घेण्याचा सल्ला देखील दिला आहे.
Tourists turning to the mountains for relief from the heat, 100 percent occupancy reached in hotels here on weekends.


नैनितालमध्ये पर्यटकांची गर्दी, ठप्प असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू…. –

नैनितालमधील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांनी भरली, पर्यटन व्यवसाय पुन्हा रूळावर….

Social Media