मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख आणि खासदार तसेच प्रमुख पदाधिका-यांना दूरदृश्य माध्यमांतून संबोधित करताना आगामी काळात हिंदुत्वाच्या मुद्यावर पंचायत ते पार्लमेट ता भाजपच्या सूत्रानुसार निवडणुकांची तयारी करण्याचे आवाहन केले आहे. आमचे हिंदुत्व सत्तेसाठी नाही तर भाजपचे हिंदुत्व केवळ सत्तेसाठी असे सांगत त्यानी काश्मिरमध्ये मेहबुबा सरकारमध्ये भाजप गेली त्यावेळी हिदुत्व सोडले होते का असा घाणाघाती सवाल केला.
शिवसेनचे हिंदुत्व राज्यभर पोहोचवा
उध्दव ठाकरे म्हणाले की, सध्या आपल्याल बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. कोरोनाचं संकंट, वादळं, पाऊस पूर ही सगळी संकंट येत होती. या संकटात आपण महाराष्ट्रासाठी झटत होतो. या धावपळीत आपल्याला भेटायला उशीर झाला आहे, पण आता आपण जोमाने उतरत आहोत. आपण लक्षात घेतलं पाहिजे. विरोधक विरोध करत राहणार पण आता तितक्याच ताकदीने आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे असेही ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच शिवसेनचे हिंदुत्व राज्यभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा असे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी खासदारांना दिले. आपण घराघरात जाणार आहोत, आपले काम लोकांना सांगा, आपण घेतलेले निर्णय घराघरात पोहोचवा असे ठाकरे यावेळी म्हणाले.
तेव्हा हे मेहबुबा मुफ्तीसोबत संसार करत होते
एक वेळ अशी होती की, ते मेहबुबा मुफ्तीसोबत संसार करत होते. आता ते आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत. आपल्याला अनेक ऑफर येत आहेत, पण आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत. महाविकास आधाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे. याआधी काही जणांनी घात केला हे विसरू नका असा टोलाही ठाकरे यानी भाजपचे नाव न घेता लगावला.
२२ मार्चपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात
येत्या २२ मार्चपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेनेच्या १९ खासदारांशी बोलताना सुतोवाच केले. खासदारांच्या मदतीला १२ पदाधिकाऱ्यांची फळी असणार आहे. शिवसंपर्क अभियानाचा पहिला टप्पा २२ ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आजी माजी नगसेवक यावेळी उपस्थित होते. शिवसेनेने काही मतदारसंघात पक्ष वाढवणे गरजेचे आहे, असे सांगत ते म्हणाले की. ज्या मतदारसंघांची यादी मला द्या ज्यामध्ये आपल्या सोबत भाजपने युती तोडली. मात्र आता भाजपकडे कोणते मतदार संघ आहेत, हे पाहा. त्यांनी कोणते जिंकले, त्या ठिकाणी तयारी करा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. या मतदारसंघांची सविस्तर यादी मला द्या, असे त्यांनी म्हटले आहे. तिथे नव्या जोमाचा उमेदवार तयार करा. माझ्याकडे नावे दया, असे ठाकरे म्हणाले. राज्यातील प्रत्येक निवडणुकीत शिवसेना सक्रिय होणार असल्याचे सांगताना ठाकरे म्हणाले लवकरच मी तुमच्यासह कानाकोप-यात फिरणार आहे. राज्यभरात शिवसेना पाळंमुळे रोवण्यासाठी सक्रिय झाली आहे.
काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल
या वर्षात राज्यात १३ मनपा निवडणुका पाईपलाईनमध्ये आहेत. याशिवाय आरक्षणामुळे रखडलेल्या जिल्हा परिषदा आणि नगरपंचायती देखील आहेत. या साठी तयार होण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. आपण शिवसंपर्क अभियान गेल्यावेळीच राबवणार होतो. पण कोरोनाची लाट आली. त्यानंतर माझ्या मानेचे दुखणे उद्भवले. मात्र आता आपल्याला जोमाने कामाला लागायचे आहे. येत्या काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसंपर्क अभियानाची जिल्हावार जबाबदारी यावेळी जाहीर करन्यात आली त्यानुसार संजय राऊत – नागपूर, अरविंद सावंत- यवतमाळ, श्रीकांत शिंदे – गडचिरोली, गजानन कीर्तिकर- अमरावती, खासदार हेमंत पाटील- अकोला, संजय जाधव – बुलढाणा, खासदार प्रताप जाधव- वाशीम, प्रियांका चतुर्वेदी- भंडारा, खासदार कृपाल तुमाणे- वर्धा अशी जबाबदारी देण्यात आली आहे.