मुंबई : शेती क्षेत्रातील(agriculture sector) मागासलेपण दूर करण्यासाठी सहकार क्षेत्र महत्वपूर्ण योगदान देऊ शकते, ज्या गावांमध्ये सहकार क्षेत्र कार्यरत आहे, तेथील लोकांचे दरडोई उत्पन्नही जास्त आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Union Minister Nitin Gadkari) यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 110 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या बँकेचे संस्थापक आणि बँकेच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या विठ्ठलदास ठाकरसी, वैकुंठभाई मेहता आणि धनंजय गाडगीळ यांच्या तैलचित्रांचे अनावरण आज नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil
)यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले, त्यावेळी गडकरी बोलत होते.
उन्नती करणे हा सहकार क्षेत्राचा मुख्य उद्देश आहे मात्र त्याचबरोबर या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. या बँकेची स्थापना झाली त्यावेळी देशासमोर गरिबी, बेरोजगारी अशी अनेक आव्हाने होती. गरिबी, उपासमारी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी सहकार क्षेत्र महत्वाचे ठरले आहे , असे त्यांनी सांगितले. आगामी काळात सहकारी बँकिंगला अधिक नफा मिळण्याच्या दृष्टीने गडकरी यांनी सहकारी स्टॉक एक्सचेंजला मान्यता देण्याची विनंती केली.
या बँकेने राज्याच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बँकिंग आणि सहकारी क्षेत्रात काम करणारी मोठी नावे या बँकेशी जोडली गेली आहेत असे खासदार शरद पवार म्हणाले. या बँकेने राज्यातील विविध घटकांना मदत केली असून शेती, व्यवसाय, शेतकरी या सर्वांना या बँकेचे सहकार्य लाभले आहे , असे सांगत ,सहकार क्षेत्रात आपल्याला आणखी पुढे जायचे आहे आणि समाजातील शेवटच्या घटकाला या माध्यमातून सक्षम करायचे आहे, असे पवार म्हणाले.
राज्याच्या विकासात या बँकेचे मोठे योगदान अधोरेखित करत, सहकार क्षेत्रात होत असलेले बदल स्वीकारून पुढे जाणे हे आव्हान असेल असे बाळासाहेब पाटील म्हणाले.
विठ्ठलदास ठाकरसी आणि वैकुंठभाई मेहता आणि धनंजयराव गाडगीळ यांनी या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या उभारणीत आणि चालविण्यात मोठे योगदान दिले आहे. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा धनंजयराव गाडगीळ या बँकेचे पहिले अध्यक्ष झाले.
The co-operative sector can make a significant contribution to addressing backwardness in the agriculture sector: Union Minister Nitin Gadkari