नागपूर: नागपुरात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कमी दर्जाचा भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांनी कमी किंमतीत का होईना भाजीपाला रस्त्याचा कडेलाच , थेट ग्राहकांना विक्री करीता उपलब्ध करून देत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे.
अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर विकण्याची वेळ आली आहे . हवामानाचा फटका फुलगोबी, पत्तागोबी, मेथी, पालक, टमाटर सह विविध भाजीपाल्यावर पडल्याने या भाजीपाला फेकण्यापेक्षा कमी किंमतीत का होईना रस्त्यावर विकून मालाचे पैसे काढण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे गोबी, मेथी, पालक 5 रुपये , 10 रुपये किलो ने विकण्याची वेळ आली आहे.
राज्य सरकार कडून शेतकऱ्यांचा नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत , लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र सध्या तरी त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे .