उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या नावाने केंद्र सरकारची नवी फेलोशिप

इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष  खा. विनय सहस्त्रबुद्धे यांची घोषणा

मुंबई : आपल्या देशामध्ये परदेशातील विविध देशातून अनेक विद्यार्थी भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्यासाठी येतात. आपल्या देशातील संस्कृती आणि संगीताचा प्रचार – प्रसार व्हावा म्हणून केंद्र सरकारतर्फे अशा विद्यार्थ्यांना १८ लाख रुपयांची शिष्यवृत्ती उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या नावाने देण्यात येईल, अशी घोषणा इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज वांद्रे येथे केली.Ustad Ghulam Mustafa Khan

आठवणींना उजाळा

इंडियन कौन्सिल-फॉर-कल्चरल-रिलेशन

पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे वांद्रे पश्चिम येथे अनेक वर्षे वास्तव्य होते. त्यामुळे उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे परिवार आणि भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांच्या पुढाकाराने  आज रंगशारदा सभागृह वांद्रे (प.) येथे खान यांच्या संगीतमय आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रसिद्ध गायक हरिहरन, पंडित शशी व्यास, आणि खा. विनय सहस्रबुद्धे आदींसह संगीत आणि फिल्म जगतातील अनेक मान्यवर उपस्थितीत होते. या प्रसंगी  सुप्रसिद्ध गायक पद्मश्री उस्ताद राशीद खान यांचे शिष्य कृष्णा बोंगाणे, सितार वादक जुबेर शेख आणि स्वरूप भालवणकर हे आपली कला सादर करीत आपल्या गुरुंना श्रध्दांजली अर्पण केली. त्यांना मंदार पुराणिक ( तबला) आणि निरंजन लेले ( संवादिनी) साथ संगत केली.

नव्या युगाशी जोडण्याचे काम

भाजपा-आमदार-अँड-आशिष-शेलार-यांच्या-पुढाकाराने-आज-रंगशारदा-सभागृह-येथे-खान-यांच्या-संगीतमय-आठवणींना-उजाळा

भारतीय शास्त्रीय संगीतातील एक अलौकिक नाव तसेच रामपूर सहसवान घराण्याची परंपरा निरंतर जपणारे पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहेब यांना १७ जानेवारीला निधन झाले. त्यांची श्रध्दांजली सभा आज झाली.. यावेळी प्रसिद्ध गायक हरिहरन यांनी अनेक आठवणींंना उजाळा दिला. खान साहब हे माणूस म्हणून खूप मोठे होते. गरिबां पासून श्रीमंतापर्यंत आणि लहानापासून मोठ्या पर्यंत  सगळ्यांशी सारख्याच आदराने ते बोलायचे. अत्यंत विनम्र भाव त्यांच्याठायी सदैव पहायला मिळायचा. तर पंडित शशी व्यास म्हणाले की ,खान साहेब यांची अलौकिक संगीत साधना होती पण त्यांनी कधीच आपल्या गाण्याचे मार्केटिंग केले नाही. अत्यंत साधेपणा हाच त्यांचा दागिना होता असे सांगत त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. तर कार्यक्रमाचे आयोजक आमदार अँड आशिष शेलार यांनी खान साहेबांच्या घरी प्रत्यक्ष भेटीला आठवणींना उजाळा दिला.

खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला तसेच खान साहेबांनी आपल्या गायकी घराण्याची परंपरा कायम ठेवून संगीताला नव्या युगाशी जोडण्याचे काम केले असे सांगून उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे संगीत क्षेत्रातील योगदान पाहता त्यांच्या नावाने फेलोशिप जाहीर केली.

Social Media