डेहराडून : मसूरी आणि नैनीताल मध्ये या शनिवारी आणि रविवारी देखील पर्यटकांची गर्दी झाली आहे. राज्यांमधून मोठ्या संख्येने पर्यटक विकेंडसाठी उत्तराखंडमध्ये दाखल होत आहेत. शुक्रवारी मसूरी आणि नैनीताल मध्ये दिवसभर वाहतूक कोंडी होती. तर, हॉटेलांमध्ये देखील ८०टक्क्यांपर्यंत बुकिंग झाली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि कोव्हिड मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करण्यासाठी पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागली.
सरकारचा इशारा आणि उच्च न्यायालयाचा काटेकोरपणा असूनही नैनीताल आणि मसूरीमध्ये पर्यटकांची गर्दी कमी झालेली नाही. विशेषतः विकेंडचा आनंद घेण्यासाठी इतर राज्यातील पर्यटक येथे पोहोचत आहेत. याशिवाय उत्तराखंडातील इतर पर्यटन स्थळांवर देखील हीच परिस्थिती कमी-जास्त प्रमाणात आहे. शुक्रवारी देखील दिल्ली, हरियाणा, पंजाब, राज्यस्थान आणि उत्तर प्रदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे पोहोचले आहेत. मसूरीतील मालरोड आणि इतर सहलीच्या ठिकाणांवर देखील पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे.
वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना कठोर परिश्रम घ्यावे लागत आहेत. दरम्यान, शारीरिक अंतर आणि मास्कची देखील दखल घेतली जात नाही. मसूरीच्या हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष एके माथुर यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सायंकाळपर्यंत हॉटेल्समध्ये ८० ते ९० टक्के पर्यटकांची बुकींग झाली होती.
Uttarakhand Tourism: Mussoorie and Nainital are getting packed for this weekend too