सुट्टी आणि वॅक्सीन टूरिझममुळे होत आहे पर्यटनाला फायदा!

नवी दिल्ली, Vaccine Tourism : कोव्हिड-१९च्या नवीन लाटेने संपूर्ण जगाला हादरून टाकले आहे आणि सर्व क्षेत्रातील व्यवसायांवर याचा परिणाम दिसून येत आहे. निर्बंधांमुळे पर्यटन क्षेत्र खूप प्रभावित झाला आहे आणि सर्व राज्यांचे सरकार या क्षेत्रांना पुनरूज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहेत जेणेकरून अर्थव्यवस्थेचे चाक पुन्हा फिरू शकेल. सुरक्षित पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात्रा आणि पर्यटन पुन्हा एकदा सुरू होण्यासाठी देशभरात वॅक्सीन पर्यटन म्हणजेच वॅक्सीन टूरिझमला (Vaccine Tourism) प्रोत्साहन दिले जात आहे. जगभरातील देश वॅक्सीन मोहीम तीव्र करत आहेत. काही देशांकडे वॅक्सीनचा पुरवठा आवश्यकतेपेक्षा अधिक आहे तर, काही देशांकडे कमी आहे जेथे लस टप्प्याटप्प्याने दिली जात आहे.

थायलंड, भारत वियतनाम आणि तैवान यांसारख्या देशांमध्ये वॅक्सीनची कमतरता आहे, ज्यामुळे या देशातील श्रीमंत कुटुंबे चांगल्या आरोग्य सुविधा आणि लसीसाठी इतर देशात जात आहेत. हा कल या साथीच्या सुरूवातीपासूनच पहायला मिळत आहे. वॅक्सीन टूरिझमसाठी भारतासारख्या अनेक ट्रॅव्हल कंपन्या लोकांना सुट्टीसह वॅक्सीन देण्याची ऑफर देत आहेत.

जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा इंद्रपुरी धरण बनत आहे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र! – 

त्याचप्रमाणे श्रीमंत रूग्णांनी न्यूयॉर्कमधील एका वैद्यकीय सेवेशी संपर्क साधला आहे जी अधिक राशीसह या शहरातील आरोग्य सेवा तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचविते. जर्मन ट्रॅव्हल कंपनी देखील अशा ठिकाणी तुम्हाला लस देण्याची ऑफर देत आहे जेथे स्थनिक लोकसंख्या पूर्णपणे वॅक्सीनेटेड आहे. मालदीव देखील आपल्या समुद्रकिनाऱ्यावर लसीची व्यवस्था करणार असल्याचे आश्वासन देत आहे. अशा प्रकारचे वॅक्सीन टूरिझम कंपन्यांसाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध होऊ शकते.
Vaccine Tourism: How Vacation and Vaccines are beneficial to Tourism.


लोकांना आकर्षित करण्यासाठी केरळ पर्यटन मंत्रालय सुरू करणार ‘इन-कार डायनिंग’ सुविधा! –

केरळ पर्यटन मंत्रालयाने लोकांना आकर्षित करण्यासाठी उचलले अनोखे पाऊल; लवकरच सुरू होणार ‘इन-कार डायनिंग’ सुविधा!

Social Media