आज पासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात

मुंबई : मुंबईमध्ये 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम(vaccination campaign) सुरू झाली आहे. या मोहिमेदरम्यान सध्या 18 ते 44 व या वयोगटातील नागरिकांसाठी वेगळा लसीचा साठा देण्यात आल्याने त्यांनाही 1 मे पासून लस दिली जात आहे. 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण(Vaccination) बंद आहे. आज रात्री लसीचा साठा आल्यावर 45 वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण केले जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. ‘मुंबईत गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू आहे. हा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

25 लाख नागरिकांना लस देण्यात आली(25 lakh citizens vaccinated)

तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 1 मे पासून लस दिली जात आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस(Vaccination of citizens) देताना 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे, याबाबत काकाणी बोलत होते. आज किंवा उद्या सकाळी लसीचा साठा आल्यावर मुंबईत पुन्हा 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. मुंबईत आतापर्यंत 25 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यातील 5 लाख नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 20 लाख नागरिकांना दुसरा डोस देण्याची गरज आहे. त्यासाठी या नागरिकांना लस देताना प्राधान्य दिले जाईल असे काकाणी यांनी यावेळी सांगितले. ‘मुंबईला येणारा ऑक्सिजन इतर जिल्ह्यांनी पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. असा प्रकार एकाच दिवशी झाला होता, त्यांनतर असा प्रकार घडलेला नाही.

 

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ(Increase in the number of deaths caused by corona)

 

ऑक्सिजनचा जो साठा आहे तो मूल्यवान आहे. कधी कधी त्याचा जास्त वापर होतो, त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला ऑक्सिजन(oxygen) जपून वापरायला सांगितलं आहे, असे काकाणी यांनी सांगितले. महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन आणि आयसीयू कमी पडू नये असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी पालिकेच्या कूपर, नेसको, सेव्हन हिल्स मुलुंड आदी रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये आयसीयू वाढवत आहोत असे काकाणी यावेळी म्हणाले.गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. रोज 50 ते 80 मृत्यू होत आहेत. याबाबत बोलताना मृत्यू बद्दल आम्ही टास्क फोर्स बरोबर बोललो आहोत. कोरोनाची 14 दिवसांची साखळी असते, ही साखळी येत्या दोन ते तीन दिवसात संपेल. त्यानंतर मृत्युची संख्या कमी होईल अशी माहिती काकाणी यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विमानाने येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे.

तसेच दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, गोवा, तामिळनाडू आदी राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर चाचणी केली जात आहे. इतर प्रवाशांचीही स्क्रिनिंग केली जात आहे. पश्चिम बंगाल आणि इतर राज्यात निवडणुका झालेल्या आहेत. या ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांचीही स्क्रिनिंग केली जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

The vaccination drive has started in Mumbai from January 16. During this campaign, a separate vaccine stock is currently being provided for citizens between the ages of 18 and 44 and are also being vaccinated from May 1. Vaccination of citizens above 45 years is stopped. Additional Commissioner of the Corporation Suresh Kakani said that citizens above 45 years of age will also be vaccinated when the vaccine stock arrives tonight. ‘Corona has been spreading in Mumbai since last March.

Social Media