मुंबई दि.२८: कोरोना कालावधीत बंद असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सोमवार, १ नोव्हेंबर पासून नियमित वेळेनुसार पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर प्रभातफेरीसाठी येणाऱ्या नागरिकांकरिता सकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत प्राणिसंग्रहालय पुन्हा खुले करण्यात येत आहे.
प्राणिसंग्रहालयातील तिकीट खिडकी सायंकाळी ५.१५ ऐवजी दररोज सायंकाळी ४ वाजता बंद करण्यात येईल. दिवसभरात , सुटीच्या दिवशी कोणत्याही वेळेस प्राणिसंग्रहालयामध्ये जास्त प्रमाणात गर्दी झाली असल्याचे निदर्शनास आल्यास कोविड सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वार पर्यटकांकरिता ताबडतोब बंद करुन तिकिट विक्री थांबविण्यात येईल. तसेच जेष्ठ नागरिक व लहान मुले (५ वर्षांखालील) यांनी शक्यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे, असे विनम्र आवाहन मम महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.