संक्रांतीमुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले; जाणून घ्या आजचे मार्केटचे ताजे दर

भोगी(Bhogi) आणि संक्रांतीसाठी(Sankranti) घरात लागणाऱ्या भाज्यांना मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाज्यांच्या खरेदीसाठी बाजारात शनिवारी आणि रविवारी गर्दी झाली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात कोणत्याही पावशेर भाजीचे दर 30 ते 40 रुपयांदरम्यान आहेत.

शनिवारी मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी(Fruits and vegetables) बाजाराचे कामकाज बंद असते. त्यामुळे किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी भाज्यांची खरेदी केली. तर रविवारी मार्केट यार्ड सुरू झाल्यानंतरही मागणी कायम राहिल्याने भाज्यांचे दर तेजीत होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

 काय आहे आज भाजीचे दर?

▪️ हरभरा गड्डी – 20 ते 30 (एक गड्डी)
▪️ वालपापडी – 120 ते 140
▪️ पापडी – 120 ते 140
▪️ वांगी – 120 ते 140
▪️ पावटा – 120 ते 140
▪️ भुईमूग शेंग – 160 ते 200
▪️ मटार – 80 ते 100
▪️ गाजर – 50 ते 60

Social Media