मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट जाणवत आहे. ब्रह्मपुरीत तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचले आहे, तर अकोल्यात ४४.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. उन्हाळ्याचा हा तीव्रतेचा काळ तुम्ही कसा हाताळत आहात? काही खास उपाय अवलंबत आहात का?
राज्यात उष्णतेचा पारा टोक गाठत असल्याचे चित्र असून आज विदर्भ मराठवाडा प्रचंड तापला आहे. बहुतांश ठिकाणी 40-45 अंश सेल्सियसच्या नोंदी होत आहेत. IMD ने नोंदवलेल्या कमाल तापमानानुसार, आज राज्याच्या उपराजधानीत नागपुरात तब्बल 44.7 अंश सेल्सियस इतक्या राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये प्रचंड उष्ण हवामान राहणार आहे. तर पुणे, सोलापूर जिल्ह्यातही आज उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय. 21 एप्रील रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तुमच्या जिल्ह्यात तापमान काय ?
नागपूर – 44.7°C, परभणी – 43.6°C, चंद्रपूर – 44.0°C, ब्रम्हपुरी – 43.6°C, वर्धा – 43.0°C, गोंदिया – 44.0°C, अमरावती – 43.8°C, यवतमाळ – 42.5°C, वाशीम – 41.8°C, अकोला – 43.5°C, बुलढाणा – 40.0°C, औरंगाबाद – 41.7°C, जळगाव – 41.7°C, लातूर – 41.2°C, बीड – 42.6°C, हिंगोली – 42.1°C, पुणे – 39.4°C, नाशिक – 37.3°C, सातारा – 39.7°C, सांगली – 37.1°C, मुंबई उपनगर – 33.0°C, मुंबई शहर – 33.4°C, ठाणे – 36.0°C, पालघर – 35.2°C, रत्नागिरी – 32.9°C, सिंधुदुर्ग – 32.0°C
The state is experiencing extreme heat, with Vidarbha and Marathwada scorching under soaring temperatures. Most regions are recording temperatures between 40 to 45 degrees Celsius. According to IMD’s observations, Nagpur—the second capital of Maharashtra—has recorded the highest temperature in the state today, reaching a blistering 44.7 degrees Celsius.