विदर्भ राज्य आंदोलन समिती वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी करणार आंदोलन…

बुलडाणा : स्वतंत्र विदर्भ राज्याची(Vidarbha State) निर्मिती त्वरित करावी , कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल सरकारे भरावे, पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ त्वरित मागे घ्यावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी नागपूर येथील विदर्भ चंडिका मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव चटप(MLA Vamanrao Chatap) यांनी बुलढाणा(Buldhana ) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

विदर्भ राज्याच्या निर्मितीकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 9 ऑगस्ट पासून नागपूर येथील शहीद चौक विदर्भ चंडिका मंदिरात येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन 15 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे अशी माहिती वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी आहे परंतु त्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. काेरोना महामारी मध्ये उद्योग व्यापार व्यवसाय बंद असताना मोठ्या प्रमाणात वीज बिल देण्यात आले आहेत हे विज बिल सरकारने भरावे किवा 200 युनिटपर्यत वीज बिल फ्री करून नंतरचे विज अर्ध करावेत अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी ही या आंदोलनामध्ये केली जाणार आहे या आंदोलनामध्ये विदर्भ राज्यातील सर्व जिल्ह्यातील विदर्भ राज्य आंदोलन समिती सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी माजी आमदार वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Vidarbha State Movement Committee chairman and former MLA Vamanrao Chatap told a press conference held in Buldhana on August 9 that a dharna will be organized in front of Vidarbha Chandika temple in Nagpur to draw attention to the demand for immediate creation of an independent Vidarbha state, filling up of entire power bill of Corona period by governments, immediate withdrawal of petrol diesel gas price hike.

Social Media