नागपूर येथे ‘विजयी दिवस’ साजरा; शहिदांना वाहिली श्रध्दांजली..

नागपूर : 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर भारताने  ऐतिहासिक विजय मिळवल्यामुळे दरवर्षी  16 डिसेंबर  हा दिवस ‘विजयी दिवस’ म्हणून साजरा केला जातो.  हे युद्ध संपल्यानंतर 93,000 पाकिस्तानी सैन्यांनी आत्मसमर्पण केले होते. 1971  च्या युद्धात भारताने पाकिस्तानला  पराभूत केले होते, त्यानंतर पूर्वी पाकिस्तान स्वतंत्र झाला, जो आता बांगलादेश म्हणून ओळखला जातो. हे युद्ध भारतासाठी ऐतिहासिक ठरले आणि प्रत्येक देशातील लोकांच्या  मनात एक नवी उमेद देणारे ठरले..

16 डिसेंबर हा दिवस ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. 1971 च्या युद्धात सुमारे 3,900 भारतीय सैनिक शहीद झाले होते, तर 9,851 जखमी झाले होते. नागपूरमधील वार मेमोरियल कॉटन मार्केट स्क्वेअर येथे वेटरन ब्रिगेडीयर सुनील गौपांडे, सचिन खेडीकर, निलेश व्यास, महेश अंबोकर, सुधाकर सार्वे आणि सैन्य, वायुसेना आणि नौदलाच्या इतर मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

 

 

TAG-Veteran Brig Sunil Gaopande/ Sachin Khedikar/ Nilesh Vyas/ Mahesh Ambokar/ Sudhakar Sarve /Veteran of Army, Air Force and Navy paid tributes / War Memorial Cotton Market Square/ Nagpur/

 

Social Media