Vikram Gokhale passes away : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे  निधन 

मुंबई : ‘हम दिल दे चुके सनम’, ‘भूल भुलैया’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसलेले बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते 75 वर्षांचे होते आणि गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. विक्रम गोखले यांच्या निधनाने बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे.

विक्रम गोखले यांच्या निधनाने बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांनी अनेक बॉलिवूड चित्रपट तसेच टेलिव्हिजन शोमध्ये काम केले होते. गेल्या शुक्रवारीच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी आली होती, मात्र आता त्यांच्या निधनाच्या माहितीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Social Media