सोलापूर : विठ्ठलाच्या (Vitthala)पदस्पर्श दर्शनाची प्रतीक्षा आता संपली जाणार आहे. २ जून पासून विठ्ठलाचे थेट पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय. तर ७ जुलै पासून विठ्ठलाचे आषाढी साठी २४ तास दर्शन सुरू असणार आहे.
मंदिर संवर्धनाचे काम ही अंतिम टप्प्यात आले आहे. मंदिराच्या संवर्धनाच्या कामासाठी 15 मार्चपासून विठ्ठलाचे(Vitthala) पदस्पर्श दर्शन बंद होते. या काळात दिवसातून केवळ पाच तास मुखदर्शन सुरू असायचे. आता मात्र दोन जून पासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन आणि संपूर्ण दर्शन व्यवस्था पूर्ववत होणार आहे.