मुंबई : रयत क्रांती संघटनेचे नेते आणि विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त पद भरतीबाबत राज्य सरकारला इशारा दिला आहे. १५ ऑगस्ट पर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा जाहीर केल्या नाहीत व ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत अशांना नियुक्ती पत्र दिले नाही वा आयोगावरील सदस्य नेमले नाहीत तर १५ ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यातील विद्यार्थ्यांना घेऊन करू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला आहे.
सरकारच्या वतीने पाळला नाही
त्यांनी जारी केलेल्या चित्रफितीमध्ये म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शब्द दिलेला होता की ३१ जुलै च्या अगोदर आम्ही या राज्यातील लोकसेवा आयोगाच्या च्या सर्व जागा भरू आणि रखडलेल्या नियुक्त्या सुद्धा दिल्या जातील तसेच राज्य लोकसेवा आयोगावरील सदस्य सुद्धा आम्ही तातडीने त्यांचीही नियुक्ती करू असा शब्द सभागृहाला दिला होता. परंतु एकही शब्द महाविकास आघाडी सरकारच्यावतीने पाळला गेला नाही.
अजून किती स्वप्नील लोणकर पाहिजेत
खोत म्हणाले की, खोट बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा कारभार या राज्यातल्या सरकारचा चालला आहे. अजून किती स्वप्नील लोणकर सारख्या आत्महत्या या सरकारला पाहिजे आहेत कारण हे सरकार खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वासघात करणारे सरकार आहे. परंतु आम्ही या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. १५ ऑगस्ट पर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा जाहीर केल्या नाहीत व ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत अशांना नियुक्ती पत्र दिले नाही व आयोगावरील सदस्य नेमले नाहीत तर १५ ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यातील विद्यार्थ्यांना घेऊन करू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी या माध्यमातून सरकार देता आहे.
Ryot Kranti Sangathan leader and legislative council member Sadabhau Khot has warned the state government about the recruitment of vacant posts of the state public service commission. Sadabhau Khot has warned the government that if the state public service commission examinations are not announced by August 15 and students who have appeared for the examinations are not given appointment letters or appointed members of the commission, the state-wide agitation will take students from the state against the Mahavikas Coalition government from August 15.