आजकाल लोकांची लाइफस्टाईल(Lifestyle) खूप जास्त बदलली आहे. जुन्या चांगल्या गोष्टी आणि सवयी मागे पडत चालल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल की, आधी घरात सगळे लोक एकत्र खाली बसून जेवण करत होते. पण आता लोकांच्या घरात डायनिंग टेबल(Dining table) आला आहे. लोक सोफ्यावर बसूनही जेवण करतात. मात्र, त्यांना खाली बसून जेवण्याचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत. खाली बसून जेवण्याच्या सवयीने तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक फायदे मिळतात. महत्वाची बाब म्हणजे आयुर्वेदातही(आयुर्वेद) याचे खूप फायदे सांगण्यात आले आहेत.
खाली बसून जेवण्याचे फायदे…
शरीराची हालचाल वाढते..
– जमिनीवर खाली बसून जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया(Digestion) सुधारते. जमिनीवर ताट असल्याने आपल्याला घास घेण्यासाठी सतत वाकावे लागते. यामुळे शरीराची हालचाल होऊन अन्न योग्य पद्धतीने पचतं. जमिनीवर बसून जेवल्यास वजन कमी करण्यात मदत होते. तसेच पोट सुटत नाही. अपचन, जळजळ असे पोटाचे विकारही होत नाहीत.
नसा मोकळ्या होतात(Nerves are free)
– जेवण करताना मांडी घालून बसल्याने शरीराच्या नसांचा मोकळ्या होतात. डायनिंग टेबलवर बसण्याऐवजी जमिनीवर बसल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. शरीराची लवचिकता वाढते. आपण जेव्हा जमिनीवर बसून जेवतो, तेव्हा पाठीचा कणा ताठ राहतो. तसेच पोट, पाठ, खाद्यांची सतत हालचाल होत राहते.
आवश्यक तेवढं जेवण
– सुखासन किंवा मांडी घालून जमिनीवर बसणे आणि जेवण करणे यामुळे जास्त जेवण केल्यास योग्य प्रमाणात जेवण करता येतं. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. खाली बसून जेवल्याने जेवढे आवश्यक आहे, तेवढेच आपण अन्न ग्रहण करतो. त्यामुळे पचन तंत्र सुरळीत राहतं आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. व्यक्तीचे वजन नियंत्रित राहते.
पाठीचा कणा चांगला राहतो
– पाठीचा कणा ताठ व मजबूत होतो आणि पाठीच्या समस्या दूर होतात. तसेच खाली बसून जेवल्याने जेवणावर जास्त लक्ष असतं. मेंदू शांत राहतो. मेंदूला लवकर कळतं की, आपलं पोट भरलं आहे. खुर्चीवर बसून किंवा उभे असताना रक्तपुरवठा हा पायाकडे जात असतो. त्यामुळे पचन तंत्र सुरळीत काम करीत नाही. याने अपचन, ऍसिडिटी (Acidity)व इतर रोगांना आमंत्रण दिल्या जातं.
कॅलरीज कमी होतात(Calories are reduced)
जमिनीवर बसून जेवण हळूहळू करता येतं. यामुळे आपण कमी प्रमाणात खातो. हे शरीरासाठी चांगलं असतं. यामुळे अधिक कॅलरीचे सेवन होत नाही.
गुडघे दुखीची समस्या दूर होते
जमिनीवर बसून खाल्ल्याने नितंबाच्या जोड, गुडघे आणि घोटे लवचिक होतात. या लवचिकपणामुळे पुढे चालून उठण्या-बसण्यासाठी त्रास होत नाही. हाडांचे रोग, समस्या दूर राहतात.
हृदय निरोगी राहतं(The heart stays healthy)
मांडी घालून बसणं हे वेगवेगळ्या योगासनातील एक आसन आहे. या आसनामध्ये शरीर आरामदायी अवस्थेत असतं आणि तणाव दूर होतो. हृदय देखील स्वस्थ राहतं. बसून खाल्ल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण सहज होते. जमिनीवर बसून खाल्ल्याने माणूस उठताना आधार न घेता उठतो यामुळे शरीर मजबूत आणि लवचिक राहते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Pain Killer मध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने थांबतात