नागपूर : डागा स्त्री रूग्णालय नागपूर, येथे कार्यरत असलेल्या अधिपरिचारिका श्रीमती वंदना नरेंद्र नान्हे केवदे यांना कोरोनाशी लढताना वीरमरण आले आहे…कोरोना रूग्णांची सुश्रृषा करताना त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आणि कोरोनाशी लढताना उपचारा दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी उपचाराला प्रतिसाद देत आहेत असे कळले होते…मात्र आज त्यांची कोरोनाशी झुंज संपली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. बातमी कळताच परिसरात आणि परिचारिकांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या परिवारास हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो अशी भावूक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.