लंडन : जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO)वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूच्या तिसऱ्या डोसची आवश्यकता असल्याचा पुरेसा पुरावा नाही. डब्ल्यूएचओने सोमवारी आवाहन करताना म्हटले की, श्रीमंत देशांद्वारे बूस्टर म्हणून वापरल्या जाणाऱ्या डोसऐवजी या लसी गरीब देशांना वाटल्या पाहिजेत ज्यांनी अद्याप त्यांच्या लोकांना लस दिलेली नाही.
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस एडनॉम घेबियस यांनी सांगितले की, जगभरात लस विषमता लोभामुळे प्रेरित आहे. त्यांनी औषध उत्पादकांना श्रीमंत देशांची वकिली करण्याऐवजी गरीब देशांना त्यांच्या कोव्हिड-१९ लसीचा पुरवठा करण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी हे आवाहन अशावेळी केले आहे जेव्हा औषध कंपन्या अमेरिकेसह काही पश्चिमी देशांमध्ये बूस्टर डोससाठी अधिकृतता शोधत आहेत.
टेड्रोस यांनी सांगितले की, लसीकरणासाठी त्वरित प्राथमिकता त्या लोकांना दिली पाहिजे ज्यांना अद्याप एकही डोस मिळालेला नाही. त्यांनी फायझर आणि मॉडर्न कंपनीला जागतिक पातळीवर लसींचे वितरण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र समर्थित कोवॅक्स, आफ्रिका वॅक्सीन एक्विजिशन टास्क टीम आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांना वॅक्सीन पुरवठा करण्याचे आवाहन केले. टेड्रोस यांनी सांगितले की, नियमित मृत्यू होणाऱ्या कोव्हिड-१९ रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे आणि अत्यंत संक्रामक डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणे देखील सतत वाढत आहेत.
फायझर आणि मॉडर्ना दोन्ही कंपन्यांनी कोवॅक्सला त्यांच्या लसींचा थोड्या प्रमाणात पुरवठा करण्यास सहमती दर्शविली आहे, परंतु त्यांचे बहुतांश डोस यापूर्वीच श्रीमंत देशांनी आरक्षित केले आहेत.
ज्या लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे त्यांना सध्या बूस्टर डोसची (Booster Dose)आवश्यकता नाही –
दरम्यान फायझर, सोमवारी अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठकीत झालेल्या तिसऱ्या बुस्टर डोससंदर्भात संघीय प्राधिकरणाच्या विनंतीवर चर्चा करीत आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने म्हटले होते की, लसीचा तिसरा डोस रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकते आणि कदाचित चिंताजनक गोष्टी दूर करण्यास मगत करू शकते. ब्रिटन देखील संभाव्य बूस्टर लसीकरण योजनेवर विचार करीत आहे, जे संभाव्य ५० वर्षाहून अधिक आणि सर्वात कमकुवत लोकांना लक्ष्य करेल.
WHO appeals not to use booster shots, know what is the reason behind it.
Senior world health agency officials say there is not enough evidence that a third dose of the corona virus is needed. The WHO appealed monday, saying the vaccines should be distributed to poor countries that have not yet vaccinated their people instead of doses used as boosters by rich countries.
फायझर आणि मॉडर्नाच्या वॅक्सीनमुळे हृदयाला सूज –
फायझर आणि मॉडर्नाच्या वॅक्सीनमुळे हृदयाला सूज, जाणून घ्या याची लक्षणे…..
केरळमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव, १४ प्रकरणांनंतर हाय अलर्ट जारी… –
केरळमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव, १४ प्रकरणांनंतर हाय अलर्ट जारी…