स्वयंपाकघरात ठेवलेली ‘ही’ गोष्ट दरवर्षी १ लाख लोकांचा घेत आहे जीव : WHO ने दिला इशारा

Who warns Excessive Salt Intake :  जेवणातील पदार्थ रूचकर लागावे म्हणून दररोजच्या वापरात येणारे मीठ आपल्या जीवनासाठी देखील धोकादायक बनू शकते. आश्चर्य वाटण्याचं कारण नाही,  जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने हा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगभरात दरवर्षी 19 लाख मृत्यूसाठी जास्त मीठाचा वापर आता जबाबदार ठरत आहे. सोडियमचा वापर कमी करण्यासाठी  पोटॅशियमयुक्त मीठाचा वापर करण्याचा सल्ला WHO ने दिला आहे.  यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

आरोग्य तज्ज्ञ वारंवार  मीठाच्या प्रमाणाासाठी इशारा देत राहतात. तसेच, बहुतेक लोक आवश्यकतेपेक्षा दुप्पट प्रमाणात मीठ वापरतात. जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि स्ट्रोक होतो. हे तीन रोग अकाली मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहेत.  लोकांना एक स्वस्थ पर्याय म्हणून पोटॅशियमयुक्त मीठ वापरण्याचे आवाहन WHO ने केले आहे.

जास्त मीठ वापरणे प्राणघातक का आहे?(Why is using too much salt deadly?)

शरीरिक हालचाली सुरळीत चालविण्यासाठी जेवणात मीठ वापरणे आवश्यक आहे. मात्र मीठाचे अत्यधिक सेवन केल्याने उच्च रक्तदाब(High blood pressure), हृदयरोग(Heart disease) आणि स्ट्रोक(Stroke) यासारखा गंभीर धोका उद्भवू शकतो.  डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, दरवर्षी जगभरात १  लाख मृत्यू अत्यधिक मीठाच्या सेवनामुळे होत आहेत.. एखाद्या प्रौढ व्यक्तीने दिवसाला 2 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ वापरू नये, परंतु बहुतेक लोक दररोज 4.3 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ वापरतात.

WHOचा नवीन सल्ला : मीठाचा पर्याय स्वीकारा

मीठाला (salt)  पर्यायी असलेल्या पोटॅशियमयुक्त मीठ वापरण्याची शिफारस  who ने केली आहे. हा कमी सोडियमवाला पर्याय आहे. यामध्ये, काही सोडियम क्लोराईड पोटॅशियम क्लोराईडने बदलले आहे. हा बदल रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयरोग, स्ट्रोक आणि अकाली मृत्यू कमी करण्यास मदत करू शकतो.

हृदय आणि स्नायूंच्या कार्यात पोटॅशियम महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तसेच, बहुतेक लोक पुरेसे सेवन करत नाहीत. डब्ल्यूएचओच्या मते, दररोज 3.5 ग्रॅम पोटॅशियमचा वापर केला पाहिजे. पोटॅशियम असलेल्या मीठाच्या सेवनामुळे हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.

 

 

चांगली झोप अंधारातच का येते?

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *