कोव्हिड-१९ लसीकरणावर डब्ल्यूएचओचा भर, व्हेरिएंट्सपासून बचाव करण्यासाठी ८० टक्के लोकसंख्येचे लसीकरण आवश्यक!

जिनेव्हा : जागतिक आरोग्य संस्थेद्वारे (World Health Organisation, WHO) कोरोना लसीकरणावर (वॅक्सीनेशन) जोर देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संस्थेने सांगितले आहे की, प्राणघातक कोरोना विषाणूच्या नवीन-नवीन व्हेरिएंट्सपासून (प्रकारांपासून) बचाव करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे वॅक्सीनेशन आहे.

संस्थेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कमीत-कमी ८० टक्के लोकसंख्येच्या लसीकरणाद्वारे या व्हेरिएंट्सची जोखीम कमी केली जाऊ शकते. एका परिषदेत जागितक आरोग्य संस्थेचे अपात्कालीन प्रमुख डॉ. मायकल रयान Dr. Michael Ryan) यांनी सांगितले की, ‘प्राणघातक कोव्हिड-१९ या साथीच्या आजारातून मुक्त होण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे जास्तीत-जास्त वॅक्सीनेशन आहे. ’ अनेक श्रीमंत देशांमध्ये आता किशोरवयीन आणि लहान मुलांना कोरोना लसीचे डोस दिले जात आहेत.

मागील महिन्याच्या शेवटी डब्ल्यूएचओने म्हटले होते की, कोरोना व्हेरिएंटवर लसीचा परिणाम होणार नाही असे नाही. तथापि संस्थेचे महासंचालक टेड्रोस अधनम घेब्रेसस यांनी याबाबत हमी घेण्यास नकार देत म्हटले आहे की, भविष्यात कदाचित असे होणार देखील नाही कारण विषाणू त्याचे रूप बदलत आहे, तर डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारतात हाहाकार माजवणाऱ्या दुहेरी उत्परिवर्ती विषाणूला (डबल म्यूटेंट व्हायरस) खूप संक्रमित असल्याचे म्हटले होते. याशिवाय त्यांनी असेही म्हटले होते की, लस या व्हेरिएंटवर देखील पूर्णपणे प्रभावी आहे.

महासंचालकांनी सप्टेंबरपर्यंत सदस्यीय देशांतील कमीत-कमी १० टक्के लोकसंख्येला लसीकरण करण्याचे अवाहन केले होते.
WHO’s emphasis on covid-19 vaccination, said – vaccination of 80 percent of the population is necessary to protect against variants.


कोरोनाचा मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास

कोरोनाचा किशोरवयींवर अधिक तणाव, मुलांच्या तुलनेत मुलींवर अधिक प्रभाव : अभ्यास

लोकांना कोरोना संसर्ग झाला परंतु कोव्हिडमुळे त्यांचा मृत्यू झाला नाही : एम्स –

लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही : एम्स अभ्यास

Social Media