नवी दिल्ली : जगातील अनेक देशांमध्ये कोरोना साथीच्या चौथ्या आणि पाचव्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची तयारी सुरू आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध देश लसीकरणावरही भर देत आहेत, मात्र तरीही त्यावर अद्याप शंभर टक्के नियंत्रण मिळालेले नाही. लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना ज्या देशांमध्ये हे काम वेगाने सुरू नाही, त्या देशांवरही लक्ष ठेवून आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) वैज्ञानिकही या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संशोधन करत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की ते कोविड-19 लशींच्या (Covid-19 vaccines) दुसऱ्या पिढीची वाट पाहत आहेत, ज्यामध्ये नाकाचे स्प्रे आणि तोंडाद्वारे घ्यायच्या लशींचा समावेश असू शकतो.
सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की अशा लशींचा (Covid-19 vaccines) सध्याच्या काळात फायदा होऊ शकतो कारण त्या इंजेक्शनच्या तुलनेत बहुतांश लोकांपर्यंत पोहोचवणे सोपे होईल. ैतकेच नव्हे तर ती स्वतः देखील घेतली जाऊ शकते, म्हणजे ती स्प्रे आणि तोंडाद्वारे घेण्यासाठी कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्याची आवश्यकता असणार नाही.
स्वामिनाथन यांनी सांगितले की, क्लिनिकल चाचण्यांनंतर 129 वेगवेगळ्या लशी (Covid-19 vaccines) लोकांसाठी तयार करण्यात आल्या आहेत, ज्यांची लोकांवर चाचणी केली जात आहे. तर 194 लषी प्रतिक्षेत आहेत, ज्यावर अजूनही काम सुरू आहे आणि त्यावर प्रयोगशाळांमध्ये अजूनही काम केले जात आहे. स्वामीनाथन यांनी सांगितले की, मला खात्री आहे की त्यापैकी काही अतिशय सुरक्षित आणि प्रभावी ठरतील.
या लशींपैकी काही फायदेशीर असू शकतात. सध्या, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपत्कालीन वापरासाठी फक्त सात कोविड-19 लशींना मान्यता दिली आहे. यामध्ये फायझर/ बायोएनटेक, मॉडर्ना, ऍस्ट्रेझेनेका, जॉन्सन अँड जॉन्सन, सिनोफार्म, सिनोवॅक आणि गेल्या आठवड्यात भारत बायोटेकने बनवलेल्या कोव्हॅक्सीनचा समावेश आहे.
In many parts of the world, the fourth and fifth waves of the Corona epidemic have wreaked havoc. Many countries are preparing to re-impose sanctions. Various countries are also pushing for vaccination to control corona, but it is still not 100 percent controlled. To accelerate the vaccination campaign, the World Health Organization (WHO) is also looking at countries where this work is not progressing fast.