मे महिन्याचा पहिला रविवार…जागतिक हास्य दिन!

हसताय ना..हसायलाच पाहिजे…असं म्हणणं जेवढं सोपं आहे, तेवढंच आजच्या परिस्थितीत याचं अवलंब करणे खूप कठिण आहे…कोरोना नावाची त्सुनामी आपल्याला काही खळखळून हसू देईना… कारण खळखळून पसरण्याचं काम सध्या कोरोना सारखा जीवघेणा विषाणू करत आहे…म्हणून काय झालं…कोण हा कोरोना , कुठून आला हा आपल्या आयुष्यात, आणि आपण का इतकं त्याला डोक्यावर घ्यायचं…कोरोनाने जसे पसरण्याची शपथ घेतली, तसं आपणही त्याला पळवून लावण्याचा विडा हाती घ्यायला हवा..आणि यासाठी आपल्या चेहऱ्यावर हसू असणं गरजेचं आहे…भलेही याने आपणा सर्वांना एकटं पाडलंय..म्हणजे दूर दूर राहण्यास भाग पाडलंय…म्हणून काय झालं आपण एकट्यामध्येही खुश राहून त्याला पळता भुई थोडी करायला काही कमी नाही आहोत…पण यासाठी गरज आहे ती संयमाची आणि या एकटेपणात देखील  कायम चेहऱ्यावर हसू ठेवणं आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी एक मोठं हत्यार आहे…असं म्हणतात ना की  हास्य हे प्रभावी औषध आहे, ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो असतो आनंदी, उत्साही आणि प्रेमळही! म्हणूनच रोजच्या जगण्यातल्या ताण-तणावांवर मात करण्यासाठी हास्याचं टॉनिक घ्यायलाच हवं. आज मे महिन्यातील पहिला रविवार..म्हणजे जागतिक हास्य दिन(World Laughter Day) हास्य ही मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे. ज्याला मनमोकळे, खळखळून हसता येते तो माणूस सुदैवी आहे. हसणार्‍या चेहर्‍याभोवती मित्रमैत्रिणींची गर्दी होते. एक वेगळाच प्रभाव समोरील व्यक्तीवर पडत असतो. शिवाय हसतमुख चेहर्‍याच्या व्यक्ती अनेक कठीण प्रसंगांवरही सहज मात करतात. हास्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हा घटक आपण जेवढा विकसित केला तेवढे आपले जीवन सुखी आणि आनंदी होत असते.

हास्य ही मूलत: जागतिक भाषा(Humor is basically a global language)

हास्य ही मूलत: जागतिक भाषा (global language)आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात तुम्ही गेला तरी या भाषेने तुम्ही इतरांसोबत संवाद साधू शकता. जगातील सर्व माणसे आनंदाची स्थिती व्यक्त करण्यासाठी याच भाषेचा वापर करतात. स्मित हास्य, खळखळून हसणं, पहाडी हास्य असे हास्यांचे विविध प्रकार असले तरी आनंद हाच त्यामागील भाव असतो. कुत्सित हास्य तेवढे प्रकर्षाने टाळावे. जगातील कोणत्याही दोन हसणार्‍या व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या असोत. कारण, हास्य हा सर्वांचा समान धर्म आहे. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी आनंदास्त्र आहे.

हास्य ही मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी(Laughter is a wonderful gift to man)

हास्य हे प्रभावी औषध आहे, मान्य आहे की आज आपल्याला घराबाहेर पडायला, सामाजिक कार्याला, कौटुंबिक कार्क्रमास मनाई आहे..आणि वून टाळेबंदी नावाची साखळी आपल्याला जखडत आहे…कारण यामुळे एकमेकांच्या भेटीगाठी बंद झाल्या..नटनं मुरडणं, तयार होणं हे सर्व सध्या बंद आहे..त्यामुळे आपण हसायचं तरी कसं असा प्रश्न बऱ्याचजणांना पडला आहे…पण हीच ती खरी लढाई आहे ज्यामध्ये आपल्याला हसत खेळत पण घरात राहूनच कोरोनारूपी राक्षसावर मात करायची आहे…  ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो असतो आनंदी, उत्साही आणि प्रेमळही! म्हणूनच रोजच्या जगण्यातल्या खास करून सध्या ओढवलेल्या परिस्थितीवर, ताण-तणावांवर मात करण्यासाठी हास्याचं टॉनिक घ्यायलाच हवं.
आज मे महिन्यातील पहिला रविवार म्हणजे जागतिक हास्य दिन. हास्य ही मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे. या देणगीला  व्यर्थ जाऊ देवू नका…संवत:ही हसा आणि कुटुंबियांना, मित्रमैत्रीणींनाही हसवा…म्हणजे हा काळ लोटण्यासाठी मदत होईल….  एक वेगळाच प्रभाव समोरील व्यक्तीवर पडत असतो आणि अवती भवती सकारात्मक उर्जा निर्माण करत असतो..आज अशा उर्जेची खरचं गरज आहे..कोरोना रूग्णांना त्यांच्या नातेवाईकांना दूरूनच का होईना पण हसण्यास मदत करा.. त्यांचे धैर्य वाढवून त्यांच्यावर ओढवलेलया परिस्थितीवर मात करण्यास मदत करा…ब्रेक द चैन ही अंतराची ठेवा मात्र, संवादाची आणि हास्याची ब्रेक द चैन कधीच होऊ देवू नका…

पुन:श्चं एकदा आठवण…हसा आणि हसवत राहा…!

Laughter is an effective medicine, the one who has a smile in his life is happy, energetic and loving too! Therefore, to overcome the stress of daily living, you must take a smile tonic. Today is the first Sunday in May. That is, world laughter day laughter is a wonderful gift to man. The man who can laugh freely, with a heart, is lucky. A crowd of friends surrounds the smiling face. A different effect is had on the other person.Moreover, smiling face individuals easily overcome many difficult situations. Laughter is an integral part of our lives. The more we develop this factor, the happier and happier our lives are.

 

 

Social Media