फेटरीत जागतिक आदिवासी दिन साजरा

नागपूर: लगतच्या फेटरी(Fetri) येथील ग्रामपंचायत आणि आदिवासी जनसमुदायातर्फे मंगळवारी जागतिक आदिवासी दिन(World Tribal Day ) साजरा करण्यात आला.World Tribal Day celebrated in Fetri

प्रारंभी आदिवासी बांधवांचा परंपरागत झेंडा फडकविण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत भवनाच्या प्रांगणातील सांस्कृतिक सभागृहात मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व क्रांतिवीर बिरसा मुंडा(Revolutionary Birsa Munda) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सरपंच धनश्री ढोमणे(Dhanashree Dhomene) यांनी मूलनिवासींना त्यांचे हक्क व मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. उपस्थित वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसह आदिवासींच्या मूलभूत अधिकार व वन हक्कांबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पवार व आकाश परतेकी, माजी सरपंच विजय शास्त्री, माजी उपसरपंच रवींद्र खांबलकर, माजी ग्रा. पं. सदस्य सुनील दोडेवार, योगिता परतेकी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मुकेश ढोमणे, बेबीताई धुर्वे राहुल शास्त्री, भालचंद्र खांबलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश परतेकी, किशोर ऊईके, विनोद टेकाम, दीपा मरसकोल्हे, प्रकाश लंगडे, लता सडमाके, मोहन परतेकी, राज सडमाके, हंसराज नंदरधने, देवा ताजने आदींनी अथक परिश्रम घेतले. भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Social Media