मुंबई : दि ५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजता दादर पूर्व येथील मुंबई मराठी
ग्रंथसंग्रहालयाच्या शारदा मंगल सभागृहात, दादर पुर्व येथे जागतिक महिला
दिनानिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय , महाराष्ट्र ग्रंथालयसंचालनालय, महिला आर्थिक
विकासमहामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने!महत्वपूर्ण परिसंवादाचे आयोजन करण्यात
आले आहे.
महिला सक्षमीकरण, कायदे ,सुरक्षा यावर सगळे बोलतात; कायदे होतात,
न्यायालयाचे आदेश होतात, पण तरीही महिला हिताचे विषय नेहमीच मागे असतात.
एक दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्र सरकारचा शक्ती कायदा आणि येणारे नवे
महिला धोरण.कागदोपत्री आपण आघाडीवर मात्र महिला प्रश्न, हक्कावर,
अंमलबजावणीत आपण मागे असतो.पुरोगामी महाराष्ट्रात आज खऱ्या अर्थाने प्रबोधन
व कृतीशील कार्यशैलीची नितांत गरज आहे.आणि म्हणूनच ही कृतीशील प्रबोधन
चळवळ गतीमान करण्यासाठी सर्वस्तरीय सहभाग ,विचारमंथन, आणि सक्षम
लोकशक्तिचा आवाज प्रखर होणे आवश्यक आहे. प्रशासक, प्रशासन व लोकसहभाग
समन्वय आणि व्यापक लोकसहभागासाठी कृतीशील प्रबोधन ही काळाची गरज
आहे.याच पार्श्वभूमीवर जागतिक महिला दिनानिमित्त ,महिला सक्षमीकरणासाठी,
कायदे ,कृतीशील अंमलबजावणी! या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांचे आभ्यास
व अनुभवावर आधारित मंथन होणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर आहेत. तर मुंबई मराठी
ग्रंथसंग्रहालयाचे उपाध्यक्ष विद्याताई चव्हाण ( राजकीय क्षेत्र ) महाराष्ट्र शासन, उच्च व
तंत्र शिक्षण विभाग – ग्रंथालय संचालनालयाच्या संचालिका शालिनी इंगोले (
ग्रंथालय क्षेत्र ), मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याध्यक्ष पत्रकार शीतल करदेकर : (
पोलीस व पत्रकारिता ) महिला आर्थिक विकास महामंडळाचे कोकण विभागीय
अधिकारी मंगेश सूर्यवंशी ( आर्थिक सक्षमीकरण ) कायापालट CMRC व्यवस्थापक
शहापूरच्या रंजना सातपुते (अनुभव कथन), सामाजिक कार्यकर्त्या अॅड. शुभांगी सारंग
( विषय : कायदे ) आदी मान्यवर संबंधित विषयावरील आपले विचार लिखित
स्वरूपात सादर करुन त्यातील ममहत्वपुर्ण मुद्दे परिसंवादात सादर करतील. या
सुसंवादानंतर या विषयावरील निवेदन व कृती आराखडा अहवाल तयार करण्यात
येणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे यांनी दिली. तसेच हा कार्यक्रम
सर्वासाठी खुला असून महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.जास्तीत जास्त
लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्याचा आयोजकांचा प्रयत्न असणार आहे.