निर्धन व दुर्बल घटकातील रूग्ण योग्य उपचारा अभावी वंचित राहु नये : सुवर्णा केवले

मुंबई : निर्धन व दुर्बल घटकातील रूग्ण योग्य उपचारा अभावी वंचित राहु नये असे मत विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले यांनी व्यक्त केले.
आज धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाबाबत राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना माहिती देण्यासाठी आज यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई व धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुबई यांच्या मार्फत एक दिवसीय प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या वेळी आपलं मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री यांचें सचिव.डॉ श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक,अमोघ कलोती धर्मादाय आयुक्त, डॉ तात्याराव लहाने, डॉ आनंद बंग, डॉ तुपकरी,भरत गायकवाड सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री डॉ गौतम बंन्साळी आदी सर मुंबई, ठाणे, नाशिक विभागातील धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी व समाजसेवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर्थिक विषमतेवर आधारित वैद्यकीय उपचार असू नयेत. पहिलं कर्तव्य हे लवकरात लवकर रुग्णांवर योग्य व तात्काळ उपचार करणे हे महत्त्वाचे आहे जास्तीत जास्त रूग्णांसाठी या योजनेचा फायदा होईल या दृष्टीने सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं मत यावेळी प्रधान सचिव सुवर्णा केवले यांनी व्यक्त केले.

धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या १० टक्के राखीव खाटाच्या माध्यमातून वंचित,गरिबी, निर्धन, रुग्णांना मोफत व सवलती च्या दरात योग्य व दर्जेदार उपचारासाठी मदत करता येईल या साठी प्रत्येक जिल्ह्यात एक दक्षता कमिटीची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून रुग्णांवर व संबंधित रुग्णालय या मध्ये समन्वय साधनं सोपे झाले आहे.आसं मत यावेळी
यावेळी श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केले.

राज्यातील धर्मादाय रुग्णालयांची संख्या मोठी असून जवळपास ४६८ आहे या निर्धन रुग्णांनासाठी ६ हजार घटका रुग्णातील घटकांसाठी सहा हजार अशा प्रकारे एकूण बारा हजार खटा आहेत. या मुळे एक ही गरजू रूग्ण आरोग्य सेवे पासून वंचित राहणार नाही याची काळजी कक्षाच्या माध्यमातून घेतली जाईल असे यावेळी श्री रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

प्रत्येक व्यक्तीला संविधानाच्या मध्यातून मुलभूत हक्क देण्यात आले आहेत या मध्ये चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा सुविधा मिळवणं हे प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे .विधी व न्याय विभाग यांच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयांतील निर्धन व दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना उपचारासाठी राखीव खाटा ठेवण्याबाबत मा उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. यांची अंमलबजावणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. असे श्री कलोती यांनी सांगितले. या वेळी उपस्थितांचे आभार शरद घावटे यांनी मानले.

Social Media