आज दिवसभरात मुंबईत 716 नवे रुग्ण; तर 15 जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत आज दिवसभरात नवीन ७१६ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ८७ हजार ८९१ झाली आहे. मुंबईत रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. आज ८७४ रुग्ण बरे झाले असून बरे होऊन सुखरूप घरी गेलेल्यांची संख्या २ लाख ६४ हजार २२८ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णाची संख्या ११ हजार ९०३ झाली आहे.

दुर्दैवाने आज १५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या १० हजार ९३५ झाली आहे. आज मृत्यू झालेल्यात १० पुरुष व ५ महिला होत्या. तर १२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते . मुंबईत बरे झालेल्या रुग्णाचा दर आता ९२ टक्के इतका झाला आहे. तर २ डिसेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान कोविडवाढीचा दर हा ० .२४ टक्के इतका आहे . ८ डिसेंबर पर्यत एकूण २० लाख ३० हजार ६६ कॉविड च्या चाचण्या करण्यात आल्या , तर मुंबईतील रुग्णांचा दुपटीचा दर हा २९३ दिवस इतका झाला आहे.

tag-mumbai/corona/Patient

Social Media