आज राज्यात ७,८६३ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई : राज्यात ७,८६३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या २१,६९,३३० झाली आहे. राज्यात ७९,०९३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ५४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५२,२३८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४१ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ५४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई २, उल्हासनगर मनपा २, पनवेल मनपा २, नाशिक ८, पुणे ३, सातारा ३, जालना ५, लातूर २, अकोला २, अमरावती ८, नागपूर ४, वर्धा २ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५४ मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६ मृत्यू सातारा २, वर्धा २, रायगड १ आणि ठाणे १ असे आहेत.

आज ६,३३२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,३६,७९० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६४,२१,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६९,३३० (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५५,७८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५५८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Social Media