कामगार विरोधी – देशविरोधी धोरणाच्या विरोधात क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला सिटूचे भारत बचाव! जनता बचाव आंदोलन!

मुंबई, : कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या निर्णयानुसार ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला सिटूच्या वतीने नाशिक जिल्ह्यात २५ ठिकाणी भारत बचाव/जनता बचाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये सिटू संलग्न विविध कामगार संघटनांच्या 1400 कामगारांनी सहभाग घेतला. मोदी सरकारच्या कामगार विरोधी-जनविरोधी व देशविरोधी धोरणाच्या विरोधात कामगार संघटनानी ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने भारत बचाव आंदोलनाची हाक दिली आहे. मोदी सरकारच्या धोरणामुळे कामगार, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक सर्वांची वाताहत झाली आहे. बेरोजगारांना काम नाही, काम करूनही वेतन मिळत नाही. कामगार कपात केली जात आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना जगण्यासाठी केंद्र सरकारने कुठलेही प्रकारचे आर्थिक मदत केलेली नाही. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे.  अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलासा दिला पाहिजे.

आयकर लागून नसलेल्या कुटुंबांना  7500/- रुपये आर्थिक मदत, दर माणशी 10 किलो धान्य देण्याची मागणी आंदोलनाच्या वेळी करण्यात आली. त्याचबरोबर कामगार कायदात केलेले कामगार विरोधी बदल रद्द करावेत. वेतन कपात व कामगार कपाती वर बंदी आणावी अशी मागणी केली. मोदी सरकार रेल्वे,कोळसा खाणी, संरक्षण कारखाने, एलआयसी या देशाच्या संपत्तीचे खाजगीकरणाच्या माध्यमातून विक्री करत आहे. हे विक्रीचे निर्णय रद्द करावेत. शेतमजुरांना मनरेगा मार्फत दोनशे दिवस काम द्यावे व किमान वेतनात वाढ करावी. आर्थिक संकटात सापडलेल्या मध्यम आणि लघु उद्योगांना मदत करावी. लॉक डाऊन काळातील वीज माफ करा, पेट्रोल-डिझेल अर्ध्या किमतीत उपलब्ध करा. सर्व स्तरावरील परीक्षा रद्द कराव्यात व ऑनलाईन शिक्षणाचा निर्णय मागे घ्यावा. अंगणवाडी, आशा, शालेय पोषण कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन द्यावे. शेतमजूर, ऊसतोडणी, यंत्रमाग, रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हर, हॉकर्स इ. असंघटितांसाठी कल्याणकारी मंडळांची स्थापना करा. इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

सातपूर परिसरात पपया नर्सरी, सातपूर बस स्टॉप, व्हीकटर सर्कल, आयटीआय सिग्नल, महिंद्रा सर्कल, एबीबी, शरणपूर चौकी, उज्वल एजन्सी तसेच सिडको परिसरात सिटी सेंटर मॉल, त्रिमूर्ती चौक, उत्तम नगर, विजय नगर, लेखा नगर, पाथर्डी फाटा,पाथर्डी गाव, उपेंद्र नगर, दत्त चौक याठिकाणी त्याचबरोबर इगतपुरी तालुक्यात गोंदे फाटा, इगतपुरी व घोटी टोल नाका येथे आणि दिंडोरी तालुक्यात हेक्झागान कंपनीच्या गेटवर हे आंदोलन करण्यात आले.  यावेळी आंदोलनकर्त्यांनी सिटूचे झेंडे व मागण्यांचे फलक हातामध्ये घेऊन घोषणा दिल्या. सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड, जिल्हा अध्यक्ष सिताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे, सिंधू शार्दुल, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, दिनेश सातभाई,गोपाल जायभावे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पाथर्डी गावाच्या सर्कल जवळ अल्फ कंपनीतील कामगार तसेच गॅलॅक्सी कंपनीचे काही कामगार उपस्थित राहून घोषणा देत केन्द्र व राज्य सरकार विरोधी निदर्शने करण्यात आले. नोवातीयार इले. & डि. सि. प्रा. लि. अंबड (Legrand) नाशिक कंपनीतील कामगारांनी विजय नगर स्टॉप येथे आंदोलन केले.

सुदाल इंडस्ट्रीज लि अंबड येथील कामगार त्रिमूर्ती चौक येथे केंद्र व राज्य सरकार विरोधी निदर्शने करण्यात आले. लुसी ईलेक्ट्रिकल्  व अल्फ इंजी. कंपनीतील कमगार केंद्र सरकार विरुद्ध निदर्शने करतांना 55 ते 60 कामगार उपस्थित होते. फिफानर  इन्स्ट्रुमेंट प्रायव्हेट लिमिटेड सारूळ विलोहळी. त्रीमुर्ती चौक दत्त मंदिर स्टॉप पेट्रोल पंपासमोर  केंद्र सरकार विरुद्ध निदर्शन करण्यात आले. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्त साधून केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करतांना ब्लू क्रॉस व रीलायेबल कंपनीतील कामगार बंधू भगिनींनी ह्यांनी  सिटी सेंटर मॉल येथे निदर्शने केली. फिनोटॅक्स फायबर कास्ट लि अंबड येथील कामगारांनी  उपेंद्र नगर भाजी मंडई येथे केंद्र व राज्य सरकार विरोधी निदर्शने केले. देवी इंटरप्रायजेस मधील कामगार डी जी पी नगर कामठवडा येथे आंदोलनात सहभागी झाले.

Social Media