मुंबई : कोरोनाच्या भीषण संकटात सर्वपातळ्यांवर लढाई सुरु असताना मदतीचा झराही वाहत आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र लोकांच्या सेवेत असलेल्या कोविडयोद्ध्यांच्या मदतीला काँग्रेसचे कार्यकर्ते धावून जात आहेत. मुंबई शहर व परिसरात बंदोबस्तावर असलेले पोलीस व महापालिकेचे सफाई कर्मचारी यांच्यासाठी चहा-नाष्टा, पिण्याचे पाणी पुरवण्याचे काम काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत.
मुंबई परिसरातील पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांना चहा-नाष्टा, पिण्याच्या पाण्याची सोय
Mumbai police, safai karamcharis get tea and breakfast, drinking water
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पांडे, महेश म्हात्रे, रेहान शेख, अजय कतुरीया यांच्यासह अनेक कार्यकर्ते मुंबई व आसपासच्या परिसरात जाऊन कोविड योध्द्यांना मदत करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन अन्नाची पाकिटे, रेशन, वैद्यकीय मदत पुरवण्यात पुढाकार घेतला होता. रिक्षा चालक, कष्टकरी, कामकरी, गरिब गरजूंच्या मदतीला धावून गेले. परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठीही मदत करण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातभार लावला. कोरोनाच्या संकटात सुरु असलेला काँग्रेसचा मदतीचा हा ओघ असाच सुरु राहणार आहे.
A stream of help is also flowing in the midst of the fierce corona crisis at all levels. Congress workers are rushing to the aid of the covidyodhis who are in the service of the people round the clock, regardless of their lives in the most hostile situation. Congress workers are working to provide tea and snacks and drinking water for the police and municipal sanitation workers who are on guard in mumbai city and locality.