छत्रपती खा. उदयनराजेची दांडी, तर खा. संभाजीराजेंनी दोन मिनिटे साधला संवाद : मराठा समाज राज्यस्तरीय बैठक!

मुंबई : मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत बैठकीत अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली. वाशीच्या माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने माथाडी भवन येथे ही बैठक पार पडली. यावेळी खा. संभाजीराजे आणि खा. उदयनराजे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मी मराठा समाजाचा सेवक आहे म्हणून माझी ही खुर्ची समाजाच्या बरोबर पाहिजे असे विधान करत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यासपीठावर बसण्यास नकार दिला आणि केवळ दोन मिनीटे संवाद साधून समाजाच्या कार्यात पाठींबा जाहीर केला. मात्र उदयनराजे या बैठकीस अनुपस्थित राहीले. तर संभाजीराजें दोन मिनिंट संवाद साधून खाली उतरले.

राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारी ११ ऑक्टोबर २०२० ला आयोजित केलेली एमपीएससीची परीक्षा ही पुढे ढकलण्यात यावी तसेच जोपर्यत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणतेही ठोस निर्णय होत नाही तोपर्यत राज्य शासनामार्फत  पोलीस किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या शासकीय  भरती घेऊ नये त्या पुढे ढकलण्यात यावी यावर चर्चा झाली.  एससीबीसीच्या अंतर्गत  राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण जाहीर केल्याप्रमाने सप्टेंबर २०२० च्या अगोदर शिक्षणामद्ये १२ टक्के आणि नोकरीत १३ टक्के आरक्षण मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शेजारील राज्य तमिळनाडू प्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील मराठा समाजासाठी तरतूद करावी हा विषय देखील चर्चेत आला. सर्वोच्च न्यायालया मद्ये विविध मराठा संघटनांनी एकत्र  येऊन एकच काँसिल द्यावा आणि पुढे केस चालवावी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात यावी असेही या चर्चेदरम्यान ठरले.

Social Media