नेस्को कोविड केंद्रातील १,५०० नवीन रुग्णशय्यांचे लोकार्पण

मुंबई :  गोरेगांव येथील नेस्को मैदानावर स्थित महापालिकेच्या वतीने संचलित समर्पित भव्य कोविड आरोग्य केंद्रातील दुसऱया टप्प्याचा भाग म्हणून १ हजार ५०० रुग्णशय्यांचे लोकार्पण राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई(Subhash Desai ) यांच्या हस्ते करण्यात आले. या रुग्णशय्यांमध्ये १ हजार रुग्णशय्या प्राणवायू पुरवठा सुविधेसह उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या नवीन क्षमतेसह नेस्को कोविड केंद्राची क्षमता आता ३ हजार ७०० रुग्णशय्या इतकी झाली आहे.

 

नेस्को केंद्रातील एकूण क्षमता आता ३ हजार ७०० रुग्णशय्या

The total capacity of the NASSCO Centre is now 3,700 patients’ bed

नेस्को कोविड केंद्रातील ‘ई’ सभागृहात एकूण १ हजार ५०० रुग्णशय्या कोविड बाधित रुग्णांवरील उपचारासाठी नव्याने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये १ हजार रुग्णशय्या प्राणवायू पुरवठा सुविधेसह तर उर्वरित ५०० सर्वसाधारण रुग्णशय्या आहेत. प्रत्येक रुग्णशय्येनजीक पंखा, लॉकर व खुर्ची पुरवण्यात आली आहे. ‘ई’ सभागृहात एकूण सहा कक्ष आहेत. प्रत्येक कक्षामध्ये २५० ते ३०० रुग्णशय्यांची क्षमता आहे. सर्व कक्षांमध्ये केंद्रीकृत वातानुकूलन सुविधा आहे. तसेच प्रत्येक कक्षामध्ये २ नर्सिंग स्टेशन, १ अन्न वितरण विभाग, १ अग्नि नियंत्रण कक्ष, समवेत २४ x ७ तत्त्वावर कार्यरत फार्मसी कौन्सिलिंग रूम, रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती पुरवण्यासाठी नियंत्रण कक्ष देखील आहे. एकूण ८ नोंदणी कक्ष, १ निरीक्षण कक्ष (१० रुग्णशय्या), १ क्ष-किरण विभाग कार्यान्वित करण्यात आले आहेत.

या नवीन सुविधेसाठी एकूण १ हजार १०० मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत. त्यात ५० सिनियर कन्सल्टंट, १६० निवासी वैद्यकीय अधिकारी, ३२० परिचारिका, ४८० रुग्णसेवा सहायक आणि ९० तांत्रिक कर्मचारीवर्ग यांचा समावेश आहे.

दरम्यान, नेस्को कोविड केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण २ हजार २०० रुग्णशय्या कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये २०० एचडीयू रुग्णशय्या तर ३०० प्राणवायू पुरवठा सुविधा असलेल्या रुग्णशय्या होत्या. दुसऱया टप्प्यातील १,५०० रुग्णशय्यांसह या केंद्राची एकूण क्षमता ३ हजार ७०० रुग्णशय्या इतकी झाली आहे. परिणामी, मुंबईतील कोविड बाधितांवरील उपचारांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

State Industries Minister Subhash Desai dedicated 1,500 patients’ beds as part of the second phase of the dedicated grand Covid Health Centre run by the BMC at Nesco Ground in Goregaon. 1000 patient beds have been made available in these patients’ beds with oxygen supply facility. With this new capacity, the capacity of the Nesco Covid Centre has now become 3,700 patient bed.

 

Social Media