नवी दिल्ली : गरीबी चे प्रमाण कमी करण्यासाठी गरीब भूमिहीनांना 5 एकर जमीन द्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या दि. 25 फेब्रुवारी रोजी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली. नवी दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदन येथे रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज झाली त्यात ना रामदास आठवले यांनी ही घोषणा केली. या बैठकीत आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढण्याबाबत ची रणनीती ठरविण्यात आली. Republican Party’s Nationwide Land Liberation Movement on February 25:Union Minister of State Ramdas Athawle announces
पश्चिम बंगाल मध्ये भाजपला विजयी करण्याचा निर्धार
पश्चिम बंगाल मध्ये भाजपला विजयी करण्याचा आणि ममता बॅनर्जी यांचे सरकार घालविण्याचा आपण निर्धार केला आहे.त्यामुळे पश्चिम बंगाल मध्ये भाजप सोबत आरपीआयची युती कारण्याबाबतचा निर्णय रिपाइंने घेतला आहे. केरळ;पाश्चिम बंगाल; आसाम; तामिळनाडू ; आणि जम्मू काश्मीर या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले. भाजपशी युती करताना भाजपने काही जागा आरपीआयला सोडाव्यात तसेच ज्या राज्यात आरपीआय ला जागा सोडणार नाही त्या राज्यात काही जागा आरपीआय स्वबळावर वाढविण्यात येतील व उरलेल्या जागांवर भाजप ला पाठिंबा देण्यात येईल असे ना रामदास आठवले(Ramdas Athawle) यांनी जाहीर केले.
नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांचे हिताचे
नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांचे हिताचे कायदे असून या कायद्यांचे स्वागत करीत असल्याचा ठराव रिपाइंच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत
आज संमत झाला.कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन लावून भारतीयांचे जीव वाचविले.गरिबांना मोठी मदत केली त्याबद्दल रिपाइंच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव संमत झाला असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी केली.या बैठकीत ना. रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले; रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर;एम. वेंकटस्वामी; एम डी शेवाळे; काकासाहेब खंबाळकर; राजीव मेनन; सैफी; दयाळ बहादूरे; फादर सुसाई; विनोद निकाळजे;मृत्युंजय मलिक; नुसरत जहा;अनिल बाबा; पवन गुप्ता; हितेश देवरी; शशी कुमार; ऍड. ए पी शिबी; सुनील मोरे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.