मुंबई : ‘कुणीही उठून सर्वोच्च न्यायालयावर टीका करतो’ अशी त्रागायुक्त खंत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. प्रसिद्ध विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी सादर केलेल्या शपथपत्रावर सुनावणी सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाचे हे मत व्यक्त झाले. सन्मानीय न्यायालयाला याची आठवण करुन द्यावीशी वाटते की भारतीय घटनेत करण्यात आलेल्या पहिल्या दुरुस्तीच्यावेळी डॉ. आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींबद्दल आदर कायम राखूनही त्यांनी दिलेल्या निर्णायवर टीका करण्याचा नागरिकांना अधिकार आहे असे म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर मा. न्यायमूर्तींचे हे विधान त्यांचा त्रागा व्यक्त करणारे आहे, एवढेच नव्हे तर घटनेने घालून दिलेल्या सभ्यतापूर्ण टीकेच्या नागरिकांच्या स्वातंत्र्यावरही तो घाला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी म्हटले आहे.
Tag-Supreme Court/Dr. Ratnakar Mahajan/सर्वोच्च न्यायालय/ डॉ. रत्नाकर महाजन