मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची तब्बल ८२ तास कसून चौकशी केल्यानंतर तिला अंमली पदाथांसंबंधी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज अटक केली.
अटकेनंतर रियाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात येईल . सायंकाळी पाचच्या सुमारास वैद्यकीय तपासणी होईल.रियाचा भाऊ शोविक आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे. एनसीबीने एनडीपीएस ऍक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे . सुशांत सिंग राजपूत यांचे वडील के. के. सिंह यांनी डॉ. सुजैन वॉकरविरोधात तक्रार दाखल केली आहे. सुशांत च्या वडिलांनी डॉक्टरविरूद्ध मेडिकल कौन्सिलकडे तक्रार केली आहे . सुजैन वॉकर हा सुशांतचा थेरपिस्ट होता. सुशांतच्या मानसिक आजारावर त्यांनी जबाब दिला आहे आणि अभिनेत्याला बायपोलर डिसऑर्डर असल्याचीही माहिती दिली होती. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रगच्या अॅगलने तपास सुरु आहे . यात रिया चक्रवर्तीला समन्स बजावून चौकशीला बोलावले होते. या चौकशीत तिने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली आहे.
रिया ही सॅम्युएल मिरांडाच्या माध्यमातून सुशांतसिंहला अंमली पदार्थ देत होती . सॅम्युएल हा शौविककडून अंमली पदार्थ मिळवत होता , असे चॅट रेकॉर्डमधून सुशांतसिंग प्रकरणात समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने ( एनसीबी ) ही कारवाई सुरू केली आहे. शौविक , सॅम्युएलसह सुशांतसिंहचा वांद्रे येथील घरातील मदतनीस दीपेश सावंत , हे तिघेही ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत आहेत . त्यानंतर एनसीबीने रविवारी सकाळी रियाला समन्स बजावले . सकाळी ११ वाजतापासून रियाची चौकशी करण्यात आली . सोमवारी पुन्हा तिची चौकशी करण्यात आली .आज पुन्हा रियाला चौकशी साठी बोलावण्यात आले. त्यानंतर तिला आज अटक करण्यात आली.