हळदीचा वापर करून घरी तयार केलेला नैसर्गिक फेसपॅक तुम्हाला देईल पार्लरसारखे सौंदर्य

हळद किती फायदेशीर आहे हे जवळजवळ सर्वानांच माहित असते. प्राचीन काळापासून हळद विविध औषधांमध्ये वापरली जात आहे. त्याच्या गुणधर्मांमुळे, आजही हळद विविध फेस पॅक, फेस वॉश आणि क्रीममध्ये वापरली जाते.

सुंदर दिसण्यासाठी आणि नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी बर्‍याच स्त्रिया तोंडावर मुलतानी मिट्टीसह हळदीचं मिश्रण करून लावतात. प्रत्येक स्त्रीला तिचा चेहरा स्वच्छ आणि चमकदार असावा अशी इच्छा असते, यासाठी ती नेहमी ब्युटी पार्लरमध्ये जात असते आणि स्वत:हाचे सौंदर्य खुलवण्यासाठी पैसेही खर्च करते. मात्र पार्लर सारखीच चमक आपल्याला  घरीच मिळू शकत असेल तर याहून दुसरी चांगली गोष्ट असू शकत नाही. तुम्हाला माहित आहे का  की घरच्याघरी हळदीचा वापर करून तुम्ही गोल्ड फेशिअल अगदी सहजपणे तयार करू शकता.  

सर्वात आधी चेहरा साफ करण्यासाठी क्लिन्जर तयार करा, ज्यासाठी 2 चमचे कच्चे दूध घ्या आणि त्यात एक चिमूटभर हळद घालून क्लिन्जर तयार करून घ्या. आता तयार केलेल्या क्लिनरमध्ये थोडा कापूस भिजवा आणि त्याच्या साहाय्याने आपला चेहरा स्वच्छ करा.

आता स्क्रब तयार करा, ज्यासाठी 1 चमचा रवा, थोडी हळद, मध आणि काही थेंब कच्च्या दुधाची आवश्यकता आहे. हवे असल्यास दुधाऐवजी गुलाब पाणी देखील वापरू शकता. आता हे तयार केलेले स्क्रब  चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मालिश करा.

यानंतर, टॉवेल गरम पाण्यात भिजवून चेहऱ्याला वाफ द्या आणि त्या टॉवेलने चेहरा स्वच्छ करा. तुम्हाला हवे असल्यास  त्याऐवजी गरम पाण्याचा वापर करून चेहऱ्यावर वाफ देखील घेऊ शकता. नंतर चेहऱ्यावर मसाज करण्यासाठी अगदी नैसर्गिक मलाई तयार करू, ज्यासाठी घरी तयार केलेलं दही घ्या, थोडी हळद, बदामाच्या तेलाचे काही थेंब घाला बदाम तेलाऐवजी ऑलिव्ह ऑईल देखील वापरू शकता. या तीन गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करा. चार ते पाच मिनिटे मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.  

फेसमास्क तयार करण्यासाठी, अर्धा चम्मच बेसन घ्या त्यात थोडी हळद, मध आणि थोडेसे दूध घालून छान मिश्रण तयार करून घ्या. आता हे फेसपॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर टोनर लावा त्यानंतर तुम्ही वापरत असलेले मॉईस्चरायजर किंवा कोणतीही क्रीम लावा.

लक्षात असू द्या की, हळदीचा पॅक किंवा फेशिअल केल्यानंतर लगेच उन्हात जाऊ नका. शक्यतो रात्री केल्यास उत्तम. घरी बनवलेल्या हळदीचाच वापर करा, बाजारात मिळणारी हळद वापरू नका कारण त्यात खाद्यपदार्थांच्या रंगाचा वापर केलेला असतो.

Social Media